Cold Wave in Maharashtra मुंबई : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात थंडीची जोरदार लाट आल्याचं दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक शहरांमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. अलीकडे काही दिवसांपासून मुंबईतही आता थंडीचा कडाखा वाढल्याचं दिसतंय. अशातच राज्यात 27 नोव्हेंबर, 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभाग प्रमुख के. एस. होसळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवानही करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
राज्यातील पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाखा वाढला असून, काही दिवस अशीच थंडी राहण्याचा अंदाज आहे. तर पुणे आणि नाशिकमध्ये थंडीचा कडाखा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर तिकडे संभाजीनगरमध्येही सलग 14 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वात कमी तापमान पुण्यात असल्याचं दिसतंय. आजही पुण्यातलं तापमान फक्त 10 डिग्रीपर्यंत आल्याची नोंद आहे. तर कोल्हापूरला अजूनही थंडीची वाट पाहावी लागणार असल्याचं दिसतंय.
कोणत्या शहरात किती तापमान?
-
छत्रपती संभाजीनगर : 14°
-
कोल्हापूर : 26.6
- महाबळेश्वर : 18.8°
- मुंबई : 25°
- पुणे : 10.6°
- परभणी : 24.8°
- मालेगाव, नाशिक : 25.8°
- अहमदनगर : 23.2°
- जेऊर, सोलापूर : 27°
- नांदेड : 25°
ADVERTISEMENT











