लोणावळा हादरलं! तरुणीला जबरदस्ती कारमध्ये ओढलं अन् सतत करत राहिले बलात्कार, 12 तासांनी रस्त्याच्या कडेलाच..

Pune Crime : लोणावळा येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका स्थानिक तरुणीचं अपहरण करून तिला धावत्या कारमध्ये जबरदस्ती ओढून लैंगिक शोषण केलं.

pune crime lonavala local young girl forcefully put in car and different place rape

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

मुंबई तक

28 Jul 2025 (अपडेटेड: 29 Jul 2025, 10:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लोणावळ्यात स्थानिक तरुणीचं अपहरण

point

धावत्या कारमध्ये जबरदस्ती ओढलं

point

रात्रभर केलं लैंगिक शोषण

Pune Crime : लोणावळा येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका स्थानिक तरुणीचं अपहरण करून तिला धावत्या कारमध्ये जबरदस्ती ओढलं, त्यानंतर त्याच कारमध्ये तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. त्यानंतर संबंधित नराधम्यांनी तिला निर्जनस्थळी फेकून दिलं आहे. पीडितेनं संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...

पीडितेनं तक्रारीत नमूद केलं की, तीन अज्ञात नराधम्यांनी लोणावळा येथील एका निर्जनस्थळी मला गाडीतून उतरवलं. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन  लैंगिक अत्याचार केला. पीडितेनं तक्रारीत म्हटलं की, हे रात्रभर माझ्यासोबत सुरूच होतं. शनिवारी सकाळी आरोपींनी मला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं होतं. पीडितेनं हिम्मत दाखवून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर लोणावळा पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी घटनास्थळाच्या भोवताली असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तपास केला. तक्रारीनुसार, पोलिसांनी 12 तासांदरम्यान, आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपीची कसून चौकशी केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. 

आरोपीची ओळख : 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक नराधमाची शरीरयष्टी जाड असून उंची 5.5 फूट आहे. दुसऱ्या आरोपीचं वय वर्षे 30 आहे. त्यानं पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्याची उंची 6 फूट असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : ठाणे जिल्हा हादरला! आईनेच पोटच्या लेकरांच्या जेवणात मिसळलं विष, हादरून टाकणारी घटना

तिसऱ्या आरोपीनेही राखाडी रंगाचा शर्ट परिधान केला होता. शरीरयष्टी मध्यम स्वरुपाची होती. तर उंची 5.5 उंची होती. चेहऱ्याचा रंग हा काळपटच असल्याची ओळख पीडितेनं तक्रारीत नमूद केलं. संबंधित प्रकरणात जिथं ही घटना घडली तिथले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. लोणावळा आणि आसपासच्या परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.

    follow whatsapp