पुणे: शंकर महाराज अंगात येतात असे भासवून पुण्यातील एका कुटुंबाची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कदायक घटना नुकतीच समोर आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिलेल्या तक्रार अर्जानुसार, पीडित कुटुंबीय हे पती-पत्नी असून एका खाजगी कंपनीमध्ये कामाला आहेत. त्यांना असलेल्या दोन्ही मुलींना व्याधी असल्यामुळे त्या आजारी असतात. त्यातील एका मुलीला अलुपेशीया नावाचा रोग असल्याने तिला कमी प्रमाणात केस येतात. या दांपत्याला भजनाची आवड असल्याने ते अनेक ठिकाणी या कार्यक्रमासाठी जात असे. यावेळी त्या दोघांची दिपक जनार्दन खडके या व्यक्तीशी ओळख झाली
ADVERTISEMENT
पुण्यातील दाम्पत्याची वेदिकाने केली मोठी फसवणूक
या दाम्पत्याच्या मुलींबाबत खडके यांना कळल्यानंतर त्याने त्यांची ओळख वेदिका कुणाल पंढरपूरकर व कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली. यावेळी त्यांनी "वेदिका शंकर बाबाची लेक असून वेदिकाच्या अंगात शंकर बाबा येतात ते तुमचे सर्व काम करून देतील तुमच्या मुलींचे आजार ठीक करतील तुम्ही निश्चित राहा" असे सांगितले.
हे ही वाचा>> Pune: बिझनेसमनची सून घरच्यांना द्यायची झोपेच्या गोळ्या, भरदिवसा बेडरूममध्ये तरुणाला बोलवायची अन् सतत करायची नको ते...
यानंतर खडके यांच्या एका दरबारात, या दाम्पत्याला जेव्हा वेदिका भेटली तेव्हा तिने अंगात शंकर बाबा आल्याचं सांगितलं तसेच शंकर महाराजांची अॅक्टिंग करून स्वतः शंकर बाबा बोलत असल्याबाबत भासवलं.
यावेळी या दाम्पत्याकडे असलेली सर्व रक्कम माझ्याकडे द्या आणि मुलीचा आजार गंभीर असून दोष जास्त आहेत त्यामुळे आजार बरा होण्यास कालावधी लागेल असं सांगून करोडो रुपये उकळले.
हे ही वाचा>> पुण्यात विवाहित पुरुषाचे 18 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध, नंतर दुसऱ्यासोबत सूत, त्याची सटकली अन् चॉपरने हल्ला करत संपवलं
यावरच न थांबता वेदिका नामक महिलेने पुन्हा एकदा शंकर महाराज यांचा अभिनय करून घर विका, शेती विका आणि पैसे जमा करा असं सांगून फसवणूक केली. मुली बऱ्या होतील या अपेक्षेने या दांपत्याने परदेशातील घर सुद्धा विकलं आणि त्याचे पैसे या महिलेला दिले.
पुढे या देविका नावाच्या महिलेने त्या दांपत्याला सुपारी, नारळ व दगड अशा वस्तू घरात ठेवण्यास सांगितल्या. शेवटचा पर्याय असल्याचे सांगून त्यांनी दांपत्याला राहते घर देखील विकण्यास भाग पडले. आपल्या मुली बऱ्या होत नसून गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या गोष्टी फसवणुकीचा हा प्रकार असल्याचे समजल्यावर आता या दांपत्याने पोलिसांकडे धाव घेतली आहे
आम्हाला खोटी माहिती देऊन त्यांचे अंगात शंकर बाबा येतात असे भासवून आमचा विश्वास संपादन करून आम्हास खोट्या भूलथापा देऊन, आश्वासन देऊन आमच्या मिळकती विकण्यास सांगून सदरची त्यांचे खात्यामध्ये जमा करण्यास सांगून आमची 13 ते 14 कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार या दांपत्याने केली आहे.
ADVERTISEMENT











