दारूच्या बदल्यात काहीतरी वेगळंच मागितलं, वादानंतर तरूणानं थेट चाकूने... पुण्यातील त्या घटनेचा उलगडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मंडई मेट्रो स्टेशनजवळ मोकळ्या जागेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृत व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती.

Mumbai Tak

मुंबई तक

06 Jun 2025 (अपडेटेड: 06 Jun 2025, 04:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील धक्कादायक प्रकरणाचा उलगडा

point

मंडई मेट्रो स्टेशन परिसरात झालवा होता खून

point

पोलिसांनी केला प्रकरणाचा उलगडा

Pune Crime News : पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनजवळील मोकळ्या जागेत एका 50 ते 55 वर्षाच्या व्यक्तीचा खून झाला होता. या खुनाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 21 वर्षीय रमेश प्रकाश सात्रे या तरुणाला अटक केली आहे. रमेशने दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून हा खून केल्याची कबुली दिली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>ShivSena UBT-MNS: 'जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल', उद्धव ठाकरेंचं मनसेसोबतच्या युतीवर सर्वात मोठं विधान!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मंडई मेट्रो स्टेशनजवळ मोकळ्या जागेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृत व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. यामुळे हे खुनाचे प्रकरण असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर रमेश सात्रे याच्यावर पोलिसांना संशय आला.

खुनानंतर रमेश पुण्याबाहेर पसार झाला होता. पोलिसांच्या विशेष पथकाने अथक प्रयत्न करून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान रमेशने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, रमेश हा व्यसनी आहे, तसेच मृत व्यक्तीही दारूच्या आहारी होती. 

हे ही वाचा >>आईनेच 17 वर्षाच्या लेकीला संपवलं! मावस, चुलत भावांनी साथ दिली, प्रेमाचा दी एंड कसा झाला?

घटनेच्या रात्री मध्यरात्री मृत व्यक्तीने रमेशकडे दारू मागितली होती. याचवेळी रमेशने त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये तुंबळ भांडण झाले. रागाच्या भरात रमेशने जवळच पडलेल्या चाकूने मृत व्यक्तीच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. सध्या मृत व्यक्तीच्या ओळखीचे काम सुरू आहे. पोलिस या दिशेने तपास करत असून, प्रकरणाचा अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp