Pune News : पुण्यात दररोज निरनिराळ्या घटना घडत आहेत. पुण्याचं नाव हे गुन्हेगारीतही आता समोर आलं आहे, तर पुण्यात हिट अँड रनसारख्या अनेक घटना हल्ली घडू लागलेल्या आहेत. याचमुळे एकेकाळी सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या याच पुणे शहरात आता माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 16 वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली उघड्यावर टाकल्याची मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पत्नीच्या कोल्ड ड्रिंकमध्ये पती मिसळायचा नशेचे पदार्थ, रात्री मित्रांना बोलावून तिच्यासोबत... तिचं आयुष्य बनलं नर्क
ससून रुग्णालयातील रुग्णांना वृद्धाश्रम
ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना परत घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती पुढे आले नाही. त्यामुळे आता अशा रुग्णांना काही दिवसानंतर विविध वृद्धाश्रमांमध्ये पाठवले जाते. ससून रुग्णालयातून अशा काही रुग्णांना Ask Old Age Home या संस्थेकडे सोपवण्यात आले. या संस्थेचे संचालक म्हणून दादासाहेब गायकवाड यांची ओळख आहे. ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून पुण्यातील फुरसुंगी येथील वृद्धाश्रम असल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र, अशातच काही दिवसानंतर संस्थेच्या प्रमुखांनी म्हणजेच दादासाहेब गायकवाड यांनी सरकारने मोफत जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा रुग्णांचा सांभाळ करणे शक्य नसल्याचं सांगितलं, त्यानंतर हे रुग्ण अक्षरश: उघड्यावर दिसत आहेत.
एका रुग्णामुळे प्रकार उघडकीस
अशातच आता भाजपचे प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर यांच्या नातेवाईकाला ससूनमधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर या संस्थेकडे सोपवण्यात आले. त्या रुग्णाचे नाव पुरोहित असे आहे. त्यांनी Ask Old Age Home या संस्थेकडे विचारपूस केली असता, तिथे एकही रुग्ण आढळून आला नाही. संस्थापकांनी भाडे वाढवल्याने रुग्णानी वृद्धाश्रम सोडून दिल्याचे सांगत, आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला. अशातच आता वृद्ध कडाक्याच्या थंडीत मुंढव्यातील भारत फोर्ससमोर ठेवून त्यांचं सांगोपन करत होते. पुरोहित या ठिकाणी नसल्याचे पाहून त्याचे नातेईवर पुष्कर यांनी तात्काळ सामाजिक विभाग आणि पोलीस आयुक्तालयात धाव घेतली.
हे ही वाचा : गावातील तरुणाशी प्रेम विवाह, कुटुंबाची तळपायाची आग मस्तकात गेली, पोटच्या पोरीला गोळ्या घालून संपवलं
ससून रुग्णालयाचे मेडिकल सुप्रिटेंडेंट काय म्हणाले?
या प्रकरणात आता ससून रुग्णालयाचे मेडिकल सुप्रिटेंडेंट यल्लपा जाधव म्हणाले की, ससून रुग्णालयातील निराधार रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक आल्यास त्यांना आम्ही स्वयंसेवी संस्थांकडे सुपूर्द करतो. दरम्यान, पुरोहित नावाचा रुग्ण आमच्याकडे एका वर्षापूर्वी आला होता, उपचारानंतर त्याला संबंधित संस्थेकडे सुपू्र्द करण्यात आले. तो आलेल्यांपैकी कोणत्याही रेकॉर्डमध्ये नाही. याबाबतची अधिकची माहिती घेत असून यात ससूनची कसलीही जबाबदारी नसल्याचं ते म्हणाले.
ADVERTISEMENT











