पुणे: अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये "अजित सृष्टी" उभारणार! भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी

महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये "अजित सृष्टी" उभारणार!

पिंपरी-चिंचवडमध्ये "अजित सृष्टी" उभारणार!

मुंबई तक

30 Jan 2026 (अपडेटेड: 30 Jan 2026, 01:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये "अजित सृष्टी" उभारणार!

point

आमदार महेश लांडगे यांची प्रशासनाला सूचना

Ajit Pawar: महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावणजी हर्डिकर यांना सविस्तर निवेदन देखील दिल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

अजितदादांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा असलेलं स्मारक 

चिंचवड येथील डी-मार्टसमोरील 33.86 एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय संकुलात सुमारे 8.65 एकर क्षेत्रावर मुख्य इमारतीचे काम सुरू आहे. भविष्यात महापालिकेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज याच ठिकाणाहून चालणार आहे. याच पार्श्वभूमीवर, या इमारतीच्या आवारातच दिवंगत अजितदादांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा असलेले स्मारक उभारण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

आमदार लांडगे यांचं निवेदन 

याबाबत आमदार लांडगे यांनी नमूद केलं आहे की, "दिवंगत अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्याला वेगळी ओळख मिळाली. असे नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड जाणे ही महाराष्ट्राची मोठी हानी असून, त्यांच्या कार्याची जपणूक होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजितदादांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करून पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात यावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत." तत्पूर्वी जुन्या महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र तातडीने बसवण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला केली आहे. 

हे ही वाचा: अजितदादांच्या अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्रित; प्रयागराजसह 'या' ठिकाणी होणार विसर्जन

राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. गुरुवारी म्हणजेच 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादांच्या निधनाने केवळ पवार कुटुंबच नाहीतर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. अजितदादांच्या जाण्याने भाजपलाही मोठा धक्का बसला आहे. 

    follow whatsapp