विद्यानंद बापटांना मारहाण करणारा मंडळाचा मारकुट्या कार्यकर्ता कोण? कुंडली आली समोर

मुंबई तक

03 Sep 2026 (अपडेटेड: 03 Sep 2026, 04:22 PM)

Pune News : पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण करणारी व्यक्ती कोण? याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

Pune News

Pune News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सार्वजनिक गणेशोत्सवात डिजेला विद्यानंद बापट यांचा विरोध

point

विद्यानंद बापट यांना मारहाण करणारी व्यक्ती कोण? 

Pune News : सार्वजनिक गणेशोत्सवात डिजेला विरोधाची भूमिका घेतल्यानंतर एका इसमाने विद्यानंद बापट यांच्या कानशीलात लगावली. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात तुफान व्हायरल होऊ लागला आहे. पुण्यातील टिळक रोड येथील ही घटना आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. विद्यानंद बापट यांना मारहाण करणारी व्यक्ती कोण? याबाबतची माहिती आता समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बापाचा मुलीच्या चारित्र्यावर संशय, लेकीची हत्या करून मृतदेह घरामागे पुरला

विद्यानंद बापट यांना मारहाण करणारी व्यक्ती कोण? 

विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीती ओळख अशोक चव्हाण अशी समोर आली आहे. ते पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी आहेत. ते एक बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरीसाठी असल्याची माहिती समोर आली. मारहाण करणारी व्यक्ती राऊतवाडीच्या प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचे सांगण्यात येते. गणेश प्रेमी असलेल्या चव्हाण यांनी बापटांवर हल्ला का केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव कसा असावा? यावर पुणे महापालिकेत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान विद्यानंतर बापट यांनी गणेशोत्सवात डीजेला विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेवर राज्यात रान पेटलं आहे. गणेश मंडळाचे कार्यकर्ते यावरून आक्रमक झाल्याचे दिसून येते. त्यानंतर विद्यानंद बापट यांच्या कानशीलात लगावल्याचा प्रकार समोर आलाय. 

हे ही वाचा : डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज काढणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण, काय घडलं? VIDEO

दरम्यान, आता विद्यानंद बापट हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांची प्रसिद्धीला आलेले आहेत. मराठी भाषा, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरील पकड यामुळे राज्यभरातील लोकांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. या नंतर माध्यमांनी त्यांच्यावर मुलाखतींचा पाऊस पाडला आहे.