Pune news : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन निष्पाप मुलींवर जातीवाचक वक्तव्य करत बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही,तर त्यांच्या चारित्र्यावरही संशय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून तीन मुलींकडे एका दिवसासाठी राहण्यास आली होती. तरुणी हरवल्याची तक्रार ही संभाजीनगर येथील एका पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी संबंधित मुलीचा मोबाईल ट्रॅक केला आणि तिचं लोकेशन पुणे आढळून आलं.
ADVERTISEMENT
त्यानंतर पोलिसांनी संबंधित तिघींच्या फ्लॅटवर जाऊन एकूण चौकशी केली. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणींना ताब्यात घेतलं आणि कोथरूड पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर त्या तिन्ही मुलींना शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगरचे उपनिरीक्षक कामटे यांनी या तिन्ही मुलींना जातीवाचक वक्तव्य केलं. तसेच शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप श्वेता एस यांनी केला आहे.
संबंधित प्रकरणात सोशल मीडियावरील फेसबुकवर श्वेता एस. यांनी एक व्हिडिओ शेअर केला. पोलिसांनी पीडित तरुणींच्या चारित्र्यावर संशय निर्माण केला. तसेच काही अपमानजनक शब्दही वापरले होते, तसेच तोकडे कपडे घालण्यावरून गंभीर आरोप केले आहेत, असा श्वेता एस यांचा आरोप आहे. त्यानंतर श्वेता पुढे म्हणाल्या की, पीएसआय कामटे यांनी मुलीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आणि तिच्या शरीराला चुकीचा स्पर्श केला. तिन्ही मुली पुण्यातील कोथरूडमध्ये राहतात आणि नोकरी करतात. मिसिंग केसेसची चौकशी पोलिसांनी या मुलींकडे केली, असे श्वेता एस यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळेंनी घेतली दखल
संबंधित प्रकरणाची दखल आता खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ एका व्हॉट्सअॅपद्वारे समोर आला. संबंधित व्हिडिओ हा या प्रकरणाच्या संदर्भातच असेल तर ही गंभीर घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेकडं गंभीर्य बाळगून लक्ष घ्यावं. संबंधित प्रकरणाची एकूण चौकशी करूनच पुढील चौकशी करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर श्वेता एस व्ही यांनी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत श्वेसा एस. या तरुणींसोबत घडलेला सर्व प्रकार सांगत आहेत. त्या म्हणाल्या की, रात्री छत्रपती संभाजीनगर येथून केसचा तपास करण्यासाठी पोलीस कोथरूड येथे आले होते. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी नेतो असे सांगून कोथरूड पोलीस ठाण्यात नेलं. कोथरूड पोलीस ठाण्याच्या रिमांड रूममध्ये नेण्यात आले आणि बेदम मारहाण केली. त्यांना काही तास तिथंच ठेवण्यात आले. तेव्हा पोलिसांनी पीडितेचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा श्वेता एस. यांनी आरोप केला.
तू किती जणांसोबत झोपलीस?
कोथरूड पोलीस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील यांनी मुलींवर जातीवाचक वक्तव्य केल्याचा आरोप श्वेता एस यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, 'तुम्ही असंच वागणारे, तुम्ही वाया जाणारे आहात. तुमची जातच तशी आहे, तू किती जणांसोबत झोपसील?, तू तर रां# आहे..' असं म्हणत अगदी खालच्या स्तरावर जाऊन तरुणींवर आरोप केल्याचं श्वेता एस म्हणाल्या आहेत.
दोघीही लेस्बियन आहात का?
तर छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय कामटे यांनी पीडित तरुणींना असभ्य वागणूक दिली. एका मुलीने पोलिसांना प्रकरण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, पीएसआय कामटे अगदी संतापले. त्यानंतर पीडित तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच कामटे यांनी मुलीला शरीराला चुकीचा स्पर्श केल्याचा तरुणींनी आरोप केला आहे. तुम्ही तोटके कपडे घालता, दोघींचेही स्कार्फ सेम आहेत दोघीही लेस्बियन आहात का? तुम्ही रां# आहात का? असा प्रश्न केला. तुम्ही दारू पित असाल आणि तुला तर काय बाप नाही म्हणल्यावर सोडूनच दिलं असेल, असे कामटे यांनी पीडित तरुणींना म्हटलं, असा श्वेता एस यांनी आरोप केला.
संबंधित प्रकरणात पोलिसांनी पीडित तरुणींची माफी मागवी अशी मागणी केली आहे. जर पोलिसांनी माफी मागितली नाही,तर आम्ही हे प्रकरण लावून धरू, अशी मागणी श्वेता एस यांनी केली आहे.
ADVERTISEMENT











