Gondia Bus Accident: दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस पलटी! 7 महिलांसह 11 जणांचा मृत्यू

Maharashtra Gondia Bus Accident News : राज्यातील गोंदियात आज शुक्रवारी बस अपघाताची धक्कादायक घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात 7 महिलांसह एकूण 11 जणांचा मृत्यू झाला.

Maharashtra Gondia Bus Accident Latest News

Maharashtra Gondia Bus Accident Latest News

मुंबई तक

• 09:12 PM • 29 Nov 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवशाही बस (MH01 EM 1273) भंडाऱ्याहून गोंदियाला निघाली अन् रस्त्यात...

point

दुचाकीस्वार बसच्या समोर आला अन् तितक्यात...

point

मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर

Maharashtra Gondia Bus Accident News : राज्यातील गोंदियात आज शुक्रवारी बस अपघाताची धक्कादायक घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात 7 महिलांसह एकूण 11 जणांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचं समजते. यामध्ये काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस (MH01 EM 1273) भंडाऱ्याहून गोंदियाला निघाली होती. बस दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास खजरी गावानजीक पलटी झाली. दुचाकीस्वार अचानक बसच्या समोर आल्यानं हा भयानक अपघात झाला.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस (MH01 EM 1273) भंडाऱ्याहून गोंदियाला निघाली होती. बस दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास खजरी गावानजीक पलटी झाली. दुचाकीस्वार अचानक बसच्या समोर आल्यानं हा भयानक अपघात झाला. या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रेलिंगला धडकली. हा अपघात घडल्यानंतर बस चालकाने पळ काढला.

या अपघातात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. शिंदेंनी मृतांच्या कुटुंबियांना 10-10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तसच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदतही जाहीर  करण्यात आलीय. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. 

 

    follow whatsapp