Mumbai: उद्धव ठाकरेंच्या नव्या ‘मातोश्री’च्या बांधकामादरम्यान अपघात, एका मजुराचा मृत्यू

मुंबई तक

22 May 2023 (अपडेटेड: 22 May 2023, 06:52 AM)

Matoshree 2: वांद्रे येथील उद्धव ठाकरे यांच्या जुन्या निवासस्थानाशेजारी त्यांच्या नव्या ‘मातोश्री’चं बांधकाम सुरू आहे. जिथे काम करताना एका मजुराचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे.

a laborer died in construction work of shiv sena ubt chief uddhav thackerays new house matoshree

a laborer died in construction work of shiv sena ubt chief uddhav thackerays new house matoshree

follow google news

Matoshree 2 Worker Death: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वांद्रे येथील नव्या ‘मातोश्री’च्या (matoshree) बांधकामादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिंत दुरुस्ती करताना काही दिवसांपूर्वी एका कामगाराचा मृत्यू झाल्याने आता या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. (a laborer died in construction work of shiv sena ubt chief uddhav thackerays new house matoshree)

हे वाचलं का?

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (17 मे) शिवराम वर्मा (वय 32 वर्ष) हा कामगार 10-12 फूट उंचीवर शिडीच्या साह्याने चढून भिंतीच्या दुरूस्तीचं काम करत होता. पण अचानक त्याचा तोल सुटला आणि तो थेट जमिनीवर कोसळला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला जवळच्या गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशी माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, “शिवराम वर्मा याचा शुक्रवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्यामुळे कंत्राटदार दत्ता पिसाळ (वय 30 वर्ष) यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अ अन्वये निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि पुढील तपास सुरू आहे.”

हे ही वाचा >> आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, शाहरुख खान-समीर वानखेडेंचं WhatsApp चॅट जसंच्या तसं…

ते पुढे म्हणाले की, वर्मा यांना या जागेवर काही बांधकाम व दुरुस्तीच्या कामासाठी रोजंदारीवर ठेवले होते आणि घटनेनंतर सहकारी मजुरांचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मातोश्री-2 नेमकी आहे तरी कशी?

ठाकरे यांची ही नवीन इमारत आठ मजली आहे. त्यात 3 डुप्लेक्स फ्लॅट्स आहेत. तर 5 बेडरूम, स्टडी रूम, होम थिएटर, स्विमिंग पूल, हाय-टेक जिम आणि मोठा हॉल देखील आहे. मातोश्री-2 ला दोन प्रवेशद्वार असतील. एक प्रवेशद्वार कलानगरमधून तर दुसरे प्रवेशद्वार बीकेसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असेल.

हे ही वाचा >> पिवळ्या बांगड्या अन् मुंडकं छाटलेला महिलेचा मृतदेह, ‘ती’ गोणी बघून पोलिसांनाही फुटला घाम!

‘मातोश्री’चा इतिहास

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली मुंबईतील दादर येथील कदम मॅन्शन या त्यांच्या घरातून शिवसेनेची स्थापना केली होती. 80 च्या दशकात बांद्रा पूर्वेतील कलानगर येथील ‘मातोश्री’ बंगल्यात बाळासाहेब आपल्या कुटुंबासह राहायला आले. 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची सत्ता आल्यावर मातोश्री बंगल्यात सुधारणा करून तळमजला असलेली तीन मजली इमारत बांधण्यात आली. आता मातोश्री बंगल्यात जागा कमी असल्याने त्यासमोर नवीन मातोश्री-2 बंगला बांधण्यात आला आहे.

    follow whatsapp