काकासमोर पुतण्याने काकीसोबत हे केलं तरी काय? काका ढसाढसा रडला, विषय जाम हार्ड!

मुंबई तक

24 Jun 2025 (अपडेटेड: 24 Jun 2025, 10:04 PM)

Aunt And Nephew Affair Viral News :  बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. येथील जमुईमध्ये काकी आणि पुतण्याच्या लग्नाच्या प्रकरणाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Aunt And Nephew Love Story Viral

Aunt And Nephew Love Story Viral

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विशालने आयुषीवर लावले गंभीर आरोप

point

आयुषीने विशालच्या आईवर केला हल्ला

point

काकी-पुतण्याच्या लव्ह स्टोरीनं उडवली खळबळ

Aunt And Nephew Affair Viral News :  बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. येथील जमुईमध्ये काकी आणि पुतण्याच्या लग्नाच्या प्रकरणाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या लग्नाबाबत इंटरनेटवर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये आयुषीचे (काकी) पती विशालने (काका) अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसच विशालने आयुषीवर आरोपांची राळही उडवली आहे. विशालने आयुषीची काय पोलखोल केली आहे, जाणून घेऊयात सविस्तरपणे..

हे वाचलं का?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बिहारच्या जमुई पोलीस ठाणे हद्दीतील सिकरिया गावातील विकास कुमार दुबेचं लग्न पटनामध्ये राहणाऱ्या आयुषीसोबत 2021 मध्ये झालं होतं. लग्नानंतर सर्वकाही चांगलं सुरु होतं. पण दोन वर्षांपूर्वी सचिनची (विशालचा भाचा) एन्ट्री झाली. सचिनही विशालच्या घराजवळ राहतो.

हे ही वाचा >>पत्नीवर अनैतिक संबंधाचे आरोप, तरुणीसह दरीत उडी मारलेल्या तलाठ्याने शेवटच्यात पत्रात उडवून दिली खळबळ

त्यामुळे तो घरी येजा करायचा. त्यानंतर सचिन आणि आयुषीमध्ये अफेअर सुरु झालं. नंतर आयुषीने विशालकडे दुर्लक्ष केलं. विशालला याबाबत कळल्यानंतर आयुषी आणि त्याच्यात वाद निर्माण झाला. विशालने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पण सचिन आणि आयुषी दोघेही गायब झाले आणि पाच दिवसानंतर गावातील मंदिरात लग्न लावलं. विशालच्या समोरचं सचिनने आयुषीच्या कपाळावर सिंदूर लावलं.

विशालने आयुषीवर लावले गंभीर आरोप

लग्नानंतर विशालने जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया दिली, तेव्हा त्याने अनेक खुलासे केले. विशालने म्हटलं, दोन वर्षांपासून मी अस्वस्थ होतो. दोघांमध्ये काय सुरु होतं, समजलं नाही. आज दोघांचं लग्न झालं आहे. मला काहीच समस्या नाहीय. पत्नी त्याच्यासोबत खुश आहे. आता मी तिला माझ्यासोबत ठेवणार नाही. हा मुलगा माझा पुतण्या आहे. रविवारी ती प्रियकरासोबत फरार झाली होती. 

हे ही वाचा >> पतीने शारीरिक संबंधासाठी पत्नीला थेट पाठवलं मित्राकडे, फक्त 'या' एका गोष्टासाठी...

विशालच्या आईवर आयुषीने केला हल्ला

विशालच्या आईला आयुषीने केलेल्या त्रासाबाबत विचारलं असता, विशालने म्हटलं, घरी आम्ही राहत नाही. वडीलही राहत नाही. फक्त आई राहते. तिचं डोकं फोडण्यात आलंय. आयुषीने गरम भाजीही तिच्या अंगावर फेकली. मुलांना मी माझ्यासोबतच ठेवणार आहे.