Pooja Jatav New Update: मध्य प्रदेशातील ग्वालियरमधील आपल्या सासूची हत्या करणाऱ्या पूजाचे बरीच अनैतिक संबंधांची प्रकरणं समोर आली आहेत. पूजाचे एक नव्हे तर दोन पती राहिले आहेत. याव्यतिरिक्त तिने आपल्या सासऱ्यांसोबत देखील शारीरिक संबंध ठेवले होते. आपल्या दिरासोबत असलेल्या संबंधांमधून तिला एक मुलगी झाल्याचा देखील दावा केला जात आहे.
ADVERTISEMENT
इतकेच नव्हे तर जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात सासू आड येत असल्याकारणाने तिने प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या केली. योग्य योजना आखून सासूची हत्या केल्याचा पूजावर आरोप आहे. आता पूजा जाटवच्या प्रकरणातील नवीन ट्विस्ट समोर आला आहे. पूजाचे दादा आणि वहिनी तिला घाबरत असल्याचं सांगितलं जात आहे.
काय म्हणाले दादा-वहिनी?
या हत्याकांडमध्ये पूजा आणि तिच्या बहिणीचं नाव समोर आल्यानंतर त्याच्या भावाची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. पूजाची भीती वाटत असल्याचं तिच्या भावाने सांगितलं. आरोपी पूजाचे दादा आणि वहिनी म्हणाले, "आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत ती अशी वागली आणि त्यांची हत्या केली, तर आमच्यासोबत देखील ती असं का नाही करणार? तिने गुन्हा केला आहे आणि तिला शिक्षा झालीच पाहिजे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आम्ही तिला कधीही स्वीकारणार नाही. तिने तिच्या आजारी वडिलांना सोडले. यानंतर आम्ही तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत."
यापूर्वी सुद्धा तरुंगात गेली...
मध्य प्रदेशातील ओरछा गावाचा रहिवासी असलेल्या रमेशसोबत पूजाचं पहिलं लग्न झालं होतं. सुरुवातील सगळं ठिक चालू असताना नंतर त्यांच्यातील वाद वाढू लागले आणि एके दिवशी तिने आपल्या पतीवर गोळी झाडली. यातून रमेशचा जीव वाचला असला तरी पूजाला तरुंगात जावं लागलं. शस्त्रास्त्र कायद्याच्या खटल्यात हजेरी लावताना उत्तर प्रदेशातील झाशीच्या तहरौली पोलीस स्टेशन परिसरातील कुम्हरिया गावाचा रहिवासी लखन उर्फ कल्याणशी पूजाची भेट झाली. कल्याणवर अनेक गुन्हेगारी गुन्हे दाखल होते.
लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहिली...
त्यानंतर पूजा कल्याणसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. एके दिवशी कल्याणचा एका रस्त्यावरील अपघातात संशयास्पद मृत्यू झाला. कल्याणच्या मृत्यूनंतर पूजा एकटीच राहिली. कल्याणचे वडील अजय राजपूत यांनी माणुसकीच्या नात्याने पूजाला आपल्या मुलाची विधवा मानून घरी आणले. त्यावेळी दिर संतोष आणि वहिनी रागिणीने तिची काळजी घेतली.
हे ही वाचा: परिसीमेचा कळस! चॉकलेट बिस्किटांचं लहान मुलीला दाखवलं आमिष, मोबाईलमधील पॉर्न व्हिडिओज् दाखवून...नको तेच
आधी दिरासोबत आणि नंतर सासऱ्यांसोबत संबंध...
पूजा जाटवने आपल्या सौंदर्याच्या आधारे आपल्या दिरालाच प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. दिरासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली आणि त्यातून तिने एका मुलीला जन्म दिला. मोठ्या वहिनीने याला विरोध केला मात्र, ती काहीच करू शकली नाही. इतकेच नव्हे तर यानंतर पूजाने आपल्या सासऱ्यांसोबत शारीरिक संबंध बनवले आणि ही बाब तिच्या सासूपर्यंत पोहोचली.
जमिनीच्या प्रॉपर्टीवर पूजाचा डोळा
स्वतःला कल्याणची विधवा म्हणवणाऱ्या पूजाने संधी साधून तिच्या वाट्याच्या 8 बिघा जमिनीची मागणी केली. जमीन विकून ग्वालियरमध्ये स्थायिक होण्याचं पूजाने प्लॅनिंग केलं होतं. पूजाच्या मागणीशी तिचे दिर आणि सासरे सहमत होते परंतु तिच्या सासूने पूजाच्या या मागणीला विरोध दर्शवला. पूजाचे सासरे अजय यांच्या नावावर झाशीमध्ये एकूण 13 बिघा जमीन आहे.
सासूच्या हत्येचं केलं प्लॅनिंग
पूजाने तिची बहीण आणि तिच्या प्रियकरासह आपल्या सासूच्या हत्येचा कट रचला. 22 जून रोजी पूजाने तिच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने तिच्या सासऱ्याला आणि मेहुण्याला ग्वालियरला बोलवले. तसेच 23 जून रोजी सकाळी पूजाने तिची बहीण कमला उर्फ कामिनी आणि तिचा प्रियकर अनिल वर्मा यांना झासीला पाठवले. दोघेही बाईकवरून तिथे आले होते. त्यावेळी सासू सुशीला देवी एकटी असताना तिला मादक औषधे देण्यात आली. यामुळे ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. हत्येनंतर कामिनी आणि अनिल पळून गेले.
हे ही वाचा: आईची क्रूरता! 4 वर्षांच्या मुलीला स्टीलच्या रॉडने वार करत... कारण ऐकून थक्क व्हाल
आधी वहिनी आणि नंतर सासऱ्याला फसवण्याचा प्रयत्न...
मोठी सून रागिणीने हे सर्व केल्याचा तिच्या सासऱ्यांना संशय आला. वहिनी फसल्याचं पाहून पूजा गप्प राहिली. मात्र, पूजाची चौकशी सुरू असताना तिने आपल्या सासऱ्यांना फसवण्यास सुरूवात केली. पोलिसांनी सासरे अजय यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी पूजाबद्दल काही गोष्टी सांगितल्या आणि यातून पोलिसांचा संशय खरा ठरला. त्यानंतर पोलिसांनी पूजाची काटेकोरपणे चौकशी केली आणि यामध्ये तिने सर्व काही कबूल केले. या सगळ्या प्रकरणात पूजाच्या मोठ्या बहिणीलाही अटक करण्यात आली आहे. पूजाने तिच्या बहिणीला जमिनीमध्ये वाटा देण्याचे आमिष दाखवून सासूची हत्या करण्याच्या कटात सामिल करून घेतले होते.
ADVERTISEMENT
