जालन्यात बैलाने शेतकऱ्याला एका दिवसात 11 लाखांचा मालक बनवलं, 'बिजल्या'ने शंकरपटात घोड्याला नमवलं

Bull made a farmer the owner of 11 lakhs in a day : बैलाने शेतकऱ्याला एका दिवसात 11 लाखांचा मालक बनवलं, 'बिजल्या'ने शंकरपटात घोड्याला घाम फोडला

Bull made a farmer the owner of 11 lakhs in a day :

Bull made a farmer the owner of 11 lakhs in a day :

मुंबई तक

06 Nov 2025 (अपडेटेड: 06 Nov 2025, 01:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बैलाने शेतकऱ्याला एका दिवसात 11 लाखांचा मालक बनवलं

point

'बिजल्या'ने शंकरपटात घोड्याला घाम फोडला

Bull made a farmer the owner of 11 lakhs in a day, जालना :  मंठा तालुक्यातील कानफोडी गावातील शेतकरी पवन राठोड यांनी आपल्या मेहनती आणि प्राणीप्रेमाच्या जोरावर मोठा पराक्रम केलाय. त्यांनी संभाळलेल्या आणि प्रशिक्षित केलेल्या 'बिजल्या' नावाच्या बैलाने त्यांना एका दिवसात 11 लाखांचा बनवलं. सांगली जिल्ह्यातील सागर कटरे यांनी हा बैल तब्बल 11 लाख 11 हजार रुपयांना विकत घेतला असून, या व्यवहाराने परिसरात चर्चेचा विषय निर्माण केला आहे. कारण बिजल्याने शंकरपटातील शर्यतीत घोड्यांनाही पाणी पाजलंय. अनेक शर्यतीत त्याने नाव कमावलं होतं. 

हे वाचलं का?

मेहनत आणि काळजीतून तयार झाला ‘बिजल्या’

पवन राठोड यांनी तमिळनाडूहून अवघ्या 51 हजार रुपयांत 10 महिन्यांच्या ‘बिजल्या’ला खरेदी केले होते. सुरुवातीपासूनच त्यांनी त्याला खास प्रशिक्षण आणि पौष्टिक आहार देण्यावर भर दिला. रोज 3 लिटर दूध, 100 ग्रॅम बदाम, 1 किलो उडीद डाळ, तसेच सायंकाळी मका आणि गहू भरडा असा आहार दिला जात असे. दर दोन दिवसांनी गरम पाण्याने आंघोळ घालून त्याची काळजी घेतली जाई. या सातत्यपूर्ण निगा आणि प्रशिक्षणामुळे ‘बिजल्या’ची ताकद, चपळता आणि आकर्षक ठेवण पाहून सर्वजण थक्क झाले.

हेही वाचा : 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खेरदी, स्टॅम्प ड्युटी अवघी 500 रुपये, दानवेंचे अजितदादांच्या मुलावर आरोप

शंकरपटातील स्टार बैल

‘बिजल्या’ हा शंकरपटातील धावपटू बैल असून, त्याने जालना, वाशिम, जिंतूर, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 30 पैकी 25 शर्यतींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या शर्यतींमधून त्याने 3 ते 4 लाख रुपयांपर्यंतची कमाई केली. घोड्यांनाही मागे टाकणाऱ्या वेगाने धावणारा हा बैल लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. दररोज सकाळी 7 वाजता ‘बिजल्या’ला 2 किलोमीटर चालवून वर्कआऊट करवले जात असे, त्यामुळे त्याची फिटनेस कायम राखली गेली.

सोशल मीडियावर लोकप्रियता

‘बिजल्या’ची कीर्ती फक्त मैदानातच नाही तर सोशल मीडियावरही गाजते. त्याच्या धावण्याचे व्हिडिओ आणि रील्स इंस्टाग्रामवर टाकल्यानंतर अवघ्या काही दिवसांत 3 हजारांहून अधिक फॉलोअर्स वाढले. मैदानात धावताना लोक त्याला ‘बिजल्या’ म्हणून हाक मारतात. तो 5 सेकंदांत 60 पॉईंट धावतो, ज्यामुळे तो मराठवाड्यातील सर्वात वेगवान बैल म्हणून ओळखला जातो.

पवन राठोड यांच्या मेहनतीमुळे ‘बिजल्या’ आज संपूर्ण मराठवाड्यात चर्चेत आला आहे. एका बैलातून इतकी कमाई होऊ शकते हे दाखवून देत त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं आहे. राठोड म्हणतात, “प्रेम, काळजी आणि नियमित प्रशिक्षण दिलं, तर कोणतीही गोष्ट मौल्यवान ठरते. मेहनतीला नेहमीच यश लाभतं.” शेतकऱ्याच्या परिश्रमातून जन्मलेला हा ‘बिजल्या’ आता केवळ एक बैल नसून, मराठवाड्यातील मेहनती शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक बनला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

साधं लग्न केलं तरी मुलं होतात म्हणणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा शाही थाटात साखरपुडा, नेटकऱ्यांनी धारेवर धरलं

    follow whatsapp