Samruddhi Mahamarg : वेगात बस अन् चालक मोबाईलवर पाहतोय कार्यक्रम; पहा Video

भागवत हिरेकर

• 04:49 PM • 19 Oct 2023

Samruddhi mahamarg news : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बस चालवताना चालक कधी मोबाईलकडे पाहतो तर कधी रस्त्याकडे पाहतो. लक्झरी बस भरधाव वेगाने जात आहे. एका प्रवाशाने चालकाचे बेफिकीर कृत्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करून ते व्हायरल केले.

samruddhi mahamarg news : Bus and driver watching video on mobile at high speed, video went viral on social media

samruddhi mahamarg news : Bus and driver watching video on mobile at high speed, video went viral on social media

follow google news

Samruddhi Mahamarg Latest News : सातत्याने अपघातांमुळे चर्चेत असलेल्या नागूपर-मुंबई समृद्धी महामार्गावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला आहे. याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर एका खासगी लक्झरी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

झालं असं की बस चालक बस चालवताना मोबाईलवर व्हिडिओ पाहत होता. तेव्हा मागून कोणीतरी चालकाच्या या कृतीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

बसमध्ये नेमकं काय घडलं?

समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या संगीत ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोच लक्झरी बसचा चालक गाडी चालवताना स्टेअरिंगच्या वर आणि स्पीडो मीटरसमोर मोबाईल ठेवून व्हिडिओ पाहत होता.

वेगात बस आणि कानात हेडफोन्स

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बस चालवताना चालक कधी मोबाईलकडे पाहतो तर कधी रस्त्याकडे पाहतो. लक्झरी बस भरधाव वेगाने जात आहे. चालकाचे हे निष्काळजी कृत्य एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून ते व्हायरल केले.

हे ही वाचा >> Condom शिवाय लैंगिक सुख! पुरुषांसाठी नवे गर्भनिरोधक! ICMR चे रिसॅग काय?

हे ही वाचा >> Gadchiroli: सून आणि मामीने 5 जणांना कसा भरवला विषाचा घास?, मृत्यूच्या तांडवाची Inside Story

व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत बुलढाणा आरटीओने आज मेहकर पोलिस ठाण्यात लक्झरी बसचालकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. चालकाचा परवाना आणि लक्झरी परमिट रद्द करण्याची शिफारस करण्यात आल्याचे आरटीओ प्रसाद गजरे यांनी दूरध्वनीवरून सांगितले.

जाणून घ्या कोण आहे हा ड्रायव्हर

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय कुमार सिंह असे लक्झरी बस चालकाचे नाव असून तो मुंबईतील काजूपाडा भागात राहतो. उल्लेखनीय म्हणजे 1 जुलै 2023 रोजी याच मार्गावर खासगी लक्झरी बसच्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्ह्यातील १२ जणांचा मृत्यू झाला होता. टेम्पो ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक बसून हा अपघात झाला होता.

    follow whatsapp