Coldrif Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया येथे बालकांच्या किडनींवर मोठा परिणाम निर्माण झाला आहे. त्यांच्यावर नागपूरातही उपचार सुरु असल्याची माहिती वृत्तमाध्यमाने दिली आहे. ज्या डॉक्टरने हे कफ सिरप लिहून दिलं ते डॉक्टर प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आशा पीडित बालकांच्या मेंदूवरही परिणाम होऊ लागला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे हादरलं! पोलिसावरच धारदार शस्त्राने वार, ड्युटी संपवून घरी जाताना दुचाकीस्वारांनी प्लॅन करुन गाठलं, नेमकं प्रकरण काय?
2 ते 9 वर्षातील लहान मुलांच्या मेंदूला सूज
अशातच आता पीडित 2 ते 9 वर्षातील लहान मुलांना कोल्ड्रिफची विषबाधा झाली. त्यांच्यावर नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. मेडिकलच्या आयसीयूमध्ये पाच बालकांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी चार बालकं ही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेली आहेत. त्यांच्या उपचारावर डॉक्टर बारकाईने लक्ष देत आहेत. दरम्यान, या विषबाधेमुळे केवळ किडनीच नाही,तर रुग्णांच्या मेंदूला सूज येऊ लागल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाची सूचना
आता याच एकूण पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने रविवारी नागरिकांसाठी प्रशासनाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. कोल्ड्रिफ सिरपमुळे धोक्याची सूचना जारी करण्यात आली. कोल्ड्रिफ सिरप नावाच्या औषधाची विक्री करणे हे तात्काळपणे थांबवावी असे तत्काळ आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा : अनिल परबांच्या आरोपांनंतर रामदास कदम यांच्या पत्नी समोर, 1993 साली काय घडलं? सगळंच सांगितलं
48.6% सिरपमध्ये विषारी रासायनिक पदार्थ
दरम्यान, प्रयोगशाळेत कोल्ड्रिफ सिरपची तपासणी केल्यानंतर 48.6% सिरपमध्ये विषारी रासायनिक पदार्थ्याचे प्रमाण आढळून आले. त्या रासायनिक पदार्थाचे नाव डायएथिलीन ग्लायलकॉल असे नाव आहे. याची भेसळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचा लहान सिरप घेतलेल्या लहान मुलांच्या किडनीवर परिणाम होतोच तर त्यांच्या मेंदूवरही परिणाम होतो.
ADVERTISEMENT
