Uttar Pradesh Crime Latest News : उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील एका डिग्री कॉलेजच्या शिक्षकाचं भयानक कृत्य उघडकीस आलं आहे. मागील 20 वर्षांपासून शिक्षक कॉलेजच्या विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य करायचा. परीक्षेत चांगले गुण आणि सरकारी नोकरीचं आमिष दाखवून आरोपी शिक्षक विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करायचा. धक्कादायक बाब म्हणजे हा शिक्षक विद्यार्थीनींचे अश्लील व्हिडीओ काढून त्यांना धमक्या देऊन ब्लॅकमेल करायचा. आरोपी शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत केलेल्या लैंगिक शोषणाचे 50-60 व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, असं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर हे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षकाचं भयंकर कृत्य उघडकीस आलं. आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत विनयभंग केल्याचं या व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं. शिक्षकाचे व्हिडीओ व्हायरल होताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले. आरोपी शिक्षक (रजनीश) फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा >> तुमच्या पैशांचं होणार तरी काय? Mutual Fund मधून लोकं काढतायेत धडाधड पैसे
हे गंभीर प्रकरण हाथरसच्या पीसी बागला डिग्री कॉलेजमध्ये घडलं. आरोपी शिक्षकावर आरोप आहे की, तो मागील दोन दशकांपासून विद्यार्थिनींचं शारिरीक शोषण करायचा. तसच आरोपी विद्यार्थिनींना परीक्षेत चांगले गुण मिळवून देणे आणि सरकरी नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवायचा. त्यानंतर आरोपी या विद्यार्थिनींचा फायदा घेत त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करायचा आणि व्हिडीओ बनवायचा. त्यानंतर या व्हिडीओंच्या माध्यमातून तो विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार करायचा. भीतीपोटी अनेक विद्यार्थिनींनी या प्रकरणात आवाज उठवला नाही. परंतु, काही विद्यार्थिनींनी हिंम्मत दाखवून हे प्रकरण उघडकीस आणलं.
तक्रार दाखल झाल्यानंतर मोठी कारवाई
राष्ट्रीय महिला आयोग आणि यूपी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली होती. शिक्षकाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपास सुरु केला.
हे ही वाचा >> Ajit Pawar: 'शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा'बाबत मोठा निर्णय, अजितदादांनी स्पष्टच सांगितलं...
कॉलेज प्रशासनावर उपस्थित केले सवाल
या संपूर्ण प्रकरणात डिग्री कॉलेज प्रशासनाचं कामकाज संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पोलिसांनी जेव्हा तपास सुरु केला त्यावेळी कॉलेज प्रशासनाने पोलिसांना सहकार्य केलं नाही. पोलीस अधिक्षकांनी चार दिवस आधीच अपर पोलीस अधिक्षक अशोक कुमार सिंग यांच्याकडे तपास सोपवला.
पोलिसांनी काय म्हटलं?
याप्रकरणी हाथरस एसपी चिरंजीवी नाथ सिन्हा यांनी म्हटलंय की, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपी शिक्षका विरोधात गुन्दा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीही काही विद्यार्थ्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT












