Arvind Kejriwal : मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

मुंबई तक

21 Mar 2024 (अपडेटेड: 21 Mar 2024, 10:42 PM)

ED Arrested kejriwal : दिल्लीचे मद्यविक्री धोरण लागू करताना त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या आरोपाप्रकरणीच ईडीने केजरीवालांना अनेकदा समन्स जारी केलेले आहे. मात्र यावेळी थेट ईडीची टीम केजरीवालांच्या घरी दाखल झाली आहे.

delhi cm arvind kejriwal arrested delhi liquor case scam

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

follow google news

ED Arrested kejriwal :  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली मद्यविक्री घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून पीएमएलए अंतर्गत अरविंद केजरीवालांवर (Arwind Kejriwal) ही अटकेची कारवाई केली गेली आहे. या कारवाईनंतर आम आदमी पार्टीच्या (AAP) कार्यकर्यांनी आंदोलनाला सूरूवात केली आहे. (ED Arrested kejriwal, arvind kejriwal,  arvind kejriwal arrested, delhi liquor case scam) 
 
दिल्ली मद्यविक्री घोटाळा प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला. याआधी केजरीवाल यांना 9 समन्स बजावण्यात आले होते. मात्र कोणत्याही समन्यला केजरीवालांनी उत्तर न दिल्याने थेट 10 समन्स घेऊन ईडीची टीम केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : BJP जिंकणार महाराष्ट्रातील 'या' जागा, पाहा संपूर्ण यादी

आज सायंकाळीच केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीची टीम दाखल झाली होती. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवालांच्या घराची झाडाझडती घ्यायला सुरूवात केली आहे. यावेळी साधारण दोन तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवालांची चौकशी सूरू केली होती. या चौकशीनतर त्यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. 

ईडीने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात अनेक दावे केले होते. प्रसिद्धीपत्रकात प्रथमच अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख करताना ईडीने दावा केला होता की, आरोपी के. कविताशी केजरीवाल यांचे नावही जोडले गेले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, के. कविता यांनी नवीन उत्पादन शुल्क धोरणाचा फायदा घेण्यासाठी आप पक्षाचे नेते, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

हे ही वाचा : Eknath Shinde : "तिकीट मिळेल की नाही, हे..."; एकनाथ शिंदेंचा आमदारांना स्पष्ट मेसेज

नवीन उत्पादन शुल्क धोरणातून वैयक्तिक फायद्यांच्या बदल्यात आप पक्षाच्या नेत्यांना 100 कोटी रुपये वितरित केले गेले. नवीन दारू धोरणात कट रचून घाऊक विक्रेत्यांमार्फत सातत्याने लाचेची रक्कम आप पक्षाकडे पाठवली जात होती. साऊथ लॉबीने आगाऊ दिलेली कोट्यवधी रुपयांची लाच दारूवरील नफ्याचे मार्जिन वाढवून वसूल करायची आणि या पॉलिसीतून दुप्पट नफा मिळवायचा होता.

 

We have moved the Supreme Court for quashing the arrest of Delhi CM @ArvindKejriwal, by ED. We have asked for an urgent hearing by the Supreme Court tonight itself.

 दरम्यान आपच्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज रात्रीच याप्रकरणी सुनावणी घेऊन केजरीवाल यांची अटक टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या कारवाईवर सुप्रिया सु्ळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी एकजुटीने अरविंद केजरीवालांसोबत उभी आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी भाजप सरकारच्या आदेशानुसार ईडीने केलेली ही आणखी एक राजकीय प्रेरित अटक आहे. आम्ही संवैधानिक लोकशाहीसाठी आमच्या लढ्यात लवचिक आणि एकजूट आहोत.

 


 

 

    follow whatsapp