Maharashtra Opinion Poll: BJP जिंकणार महाराष्ट्रातील 'या' जागा?, पाहा संपूर्ण यादी

मुंबई तक

ADVERTISEMENT

भाजप महाराष्ट्रात जिंकणार 24 जागा, सर्व्हेचा अंदाज
भाजप महाराष्ट्रात जिंकणार 24 जागा, सर्व्हेचा अंदाज
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Opinion Poll BJP: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) ही महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची ठरणार आहे. भाजपने मागील अडीच वर्षात ज्या आक्रमकपणे महाराष्ट्रात राजकारण केलं आहे त्यामुळे त्यांचे विरोधक हे अत्यंत ताकदीने एकत्र आले आहेत. एकीकडे भाजपने महायुतीच्या साथीने महाराष्ट्र काबीज करण्याची रणनिती आखलेली असताना दुसरीकडे महाविकास आघाडी देखील तेवढ्याच ईर्षेने निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. पण असं असलं तरी यंदाच्या निवडणुकीतही भाजप महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवेल असा अंदाज  इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. (india tv cnx maharashtra opinion poll bjp to win total 24 seats in maharashtra see the full list lok sabha election 2024)

2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने सलग 23 जागा जिंकण्याचा विक्रम महाराष्ट्रात केला आहे. पण आता 2024 च्या निवडणुकीत ते आपलाच रेकॉर्ड मोडतील असा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Lok Sabha 2024 Dates : तुमच्या मतदारसंघात कधी होणार मतदान?

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची शिवसेनेची युती होती. ज्याचा थेट फायदा त्यांना त्यावेळी झाला होता. मात्र, आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फूट या गोष्टींचा नेमका भाजपला फायदा होणार की तोटा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण ओपिनियन पोलनुसार, यंदाच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात तब्बल 24 जागा जिंकू शकतात. ज्या मागील निवडणुकींमधील जागांपेक्षा एकने अधिक आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. India TV-CNX च्या ओपिनियन पोलनुसार, यंदाच्या निवणडुकीत राज्यात 48 पैकी 24 जागा या भाजपला मिळतील. मात्र, असं असलं तरीही मागील दोन्ही निवडणुकीत NDA ला जेवढ्या जागा जिंकता आल्या होत्या तेवढ्या मात्र जिंकता येणार नाही. 

कारण महाविकास आघाडी देखील महाराष्ट्रात तब्बल 13 जागांवर विजय मिळू शकतो असा अंदाज सर्व्हेतून वर्तविण्यात आला आहे. 2014, 2019 निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मिळून 41 जागा जिंकल्या होत्या. पण आता तो आकडा गाठणं हे एनडीएसाठी कठीण असल्याचं दिसतं आहे. 

ADVERTISEMENT

ओपिनियन पोलनुसार, भाजप महाराष्ट्रातील कोणकोणत्या जागा जिंकणार?

 

ADVERTISEMENT

 1. मुंबई उत्तर - भाजप
 2. मुंबई उत्तर पूर्व - भाजप 
 3. मुंबई उत्तर मध्य - भाजप
 4. नंदूरबार -भाजप
 5. धुळे - भाजप
 6. जळगाव -भाजप
 7. दिंडोरी -भाजप
 8. अकोला - भाजप
 9. अमरावती - भाजप
 10. वर्धा -  भाजप
 11. नागपूर - भाजप
 12. भंडारा-गोंदिया - भाजप
 13. गडचिरोली चिमूर -भाजप
 14. चंद्रपूर - भाजप
 15. नांदेड - भाजप
 16. जालना - भाजप
 17. लातूर - भाजप
 18. बीड - भाजप
 19. पालघर - भाजप
 20. भिवंडी - भाजप
 21. पुणे - भाजप
 22. अहमदनगर - भाजप
 23. सोलापूर - भाजप 
 24. सांगली - भाजप

हे ही वाचा>> 'मेला तर पुन्हा बाय इलेक्शन', अजित पवारांची शिवतारेंनी उडवली झोप

सर्व्हेनुसार, महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कोणता पक्ष मारणार बाजी?

 • मुंबई उत्तर - भाजप
 • मुंबई उत्तर पश्चिम - शिवसेना
 • मुंबई उत्तर पूर्व - भाजप 
 • मुंबई उत्तर मध्य - भाजप
 • मुंबई दक्षिण मध्य - शिवसेना
 • मुंबई दक्षिण - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
 • नंदूरबार -भाजप
 • धुळे - भाजप
 • जळगाव -भाजप
 • दिंडोरी -भाजप
 • नाशिक -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
 • बुलढाणा - शिवसेना
 • अकोला - भाजप
 • अमरावती - भाजप
 • वर्धा -  भाजप
 • रामटेक - काँग्रेस
 • नागपूर - भाजप
 • भंडारा-गोंदिया - भाजप
 • गडचिरोली चिमूर -भाजप
 • चंद्रपूर - भाजप
 • यवतमाळ वाशिम - शिवसेना
 • हिंगोली - काँग्रेस
 • नांदेड - भाजप
 • परभणी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
 • जालना - भाजप
 • छत्रपती संभाजीनगर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
 • धाराशिव - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
 • लातूर - भाजप
 • बीड - भाजप
 • पालघर - भाजप
 • भिवंडी - भाजप
 • कल्याण - शिवसेना 
 • ठाणे - शिवसेना
 • रायगड - राष्ट्रवादी काँग्रेस
 • मावळ - राष्ट्रवादी काँग्रेस
 • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
 • पुणे - भाजप
 • बारामती - राष्ट्रवादी काँग्रेस
 • शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
 • अहमदनगर - भाजप
 • शिर्डी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
 • सोलापूर - भाजप 
 • माढा - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
 • सांगली - भाजप
 • सातारा - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
 • कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस
 • हातकणंगले -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  follow whatsapp

  ADVERTISEMENT