Maharashtra Lok Sabha Election 2024 Dates : तुमच्या मतदारसंघात कधी होणार मतदान?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election 2024 Dates, Phase Wise Full Schedule : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा २०२४ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ४८ जागा असून, महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर जाणून घ्या तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या तारखेला मतदान होणार?

lok sabha election voting dates : पहिल्या टप्प्यात कोणत्या मतदारसंघात मतदान?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. 

lok sabha election voting Second Phase : दुसऱ्या टप्प्यात विदर्भ-मराठवाडा

26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'निलेश लंकेंची आमदारकी जाईल, पक्षांतरबंदी...' असं म्हणण्याची अजितदादांवर का आली वेळ?

तिसऱ्या टप्प्यात कोकण-मराठवाडा

7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील खालील मतदारसंघांचा समावेश आहे. 

-रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकंणगले.

ADVERTISEMENT

चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघ

13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड.

ADVERTISEMENT

हेही वाचा >>  'प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही', पंकजा मुंडेंनी दिला शब्द

पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईत मतदान

20 मे रोजी पाचव्या टप्प्यामधील मतदान पार पडणार आहे. या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT