Ajit Pawar : 'निलेश लंकेंची आमदारकी जाईल, पक्षांतरबंदी...' असं म्हणण्याची अजितदादांवर का आली वेळ?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 ajit pawar warning nilesh lanke sharad pawar party joining speculation ahmednagar south lok sabha
निलेश लंकेने जर वेगळा निर्णय घेतला तर त्याला आमदारकी सोडावी लागेल, नाहीतर त्याची आमदारकी रद्द तरी होईल.
social share
google news

Ajit Pawar Reaction On Nilesh Lanke : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. लंकेंचा हा पक्षप्रवेश आजच होईल, अशी देखील चर्चा आहे. या चर्चेवर आता उप मुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'निलेश लंकेनी जर वेगळी भूमिका घेतली तर त्याची आमदारकीच रद्द होईल', असा इशाराचा अजित पवारांनी (Ajit Pawar ) निलेश लंकेंना   (Nilesh Lanke)दिला आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या या इशाऱ्यानंतर निलेश लंके पक्षप्रवेश करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (ajit pawar warning nilesh lanke sharad pawar partyb party joining speculation ahmednagar south lok sabha)  

ADVERTISEMENT

अजित पवारांनी बारामतीत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेतून अजित पवारांनी निलेश लंकेंना इशारा दिला आहे. ''निलेश लंके हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्याला जर वेगळाही काही निर्णय घ्यायचा असेल, तर त्यांनी घेऊ नये, हे माझे त्याला आव्हान आणि विनंती देखील आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : मुनगंटीवारांची सर्वात मोठी परीक्षा, अहिर करणार गेम?

तसेच  बुधवारी तो (निलेश लंके) मला भेटला होता. त्याला जर निर्णय घ्यायचाचं झाला तर त्याला आमदारकी सोडावी लागेल, नाहीतर त्याची आमदारकी रद्द तरी होईल. एखाद्याने पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली, तर पक्ष कारवाई करू शकतो, असा इशारा देखील अजित पवारांनी निलेश लंकेंना दिला आहे. त्यामुळे आता निलेश लंके काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान अजित पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतरही निलेश लंके शरद पवार गटात जाण्यास ठाम असल्याची सुत्रांची माहिती आहे. तसेच आज निलेश लंके शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आहे. त्यामुळे निलेश लंकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास ते अहमदनगरमधून लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखेंच्या विरोधात निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात असण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : 'पवारांचा फोटो वापरू नका', अजितदादांना कोर्टाचा दणका!

तसेच निलेश लंके आज पुण्याला जात असताना ज्या गाडीत प्रवास करत होते. त्या गाडीचा नंबर खुप काही सांगुन जात आहे. शरद पवार ज्या गाडीत प्रवास करतात. त्या प्रत्येक गाडीचा नंबर हा 333 असतो.  ह्या नंबरच्या गाडीत निलेश लंके हे आज पुण्यात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले आहेत. पारनेरचे आमदार  निलेश लंके यांनी कोविड काळात केलेल्या कामाचा अनुभव सांगणारे पुस्तक मी अनुभवला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात होत आहेत. या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार असुन येथेच त्याचा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT