Nagpur Rain : पूरग्रस्त नागपुरकरांसाठी घोषणा! फडणवीस-गडकरींच्या बैठकीत काय झालं?

योगेश पांडे

• 04:39 PM • 23 Sep 2023

Nagpur Rain Updates : देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्र्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत, दुकानांच्या क्षतीसाठी 50 हजारांपर्यंत मदत आणि टपरीधारकांनाही 10 हजारापर्यंत मदत देणार असल्याची घोषणा केली.

nagpur rain news : Devendra fadnavis and nitin gadkari conduct review meeting of nagpur flood situation.

nagpur rain news : Devendra fadnavis and nitin gadkari conduct review meeting of nagpur flood situation.

follow google news

Heavy rain in nagpur today : मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर महानगरपालिकेत आढावा घेतला. या बैठकीत पूरग्र्रस्त नागपुरकरांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत, तसेच दुकानांच्या नुकसान भरपाईसाठी 50 हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार, अशा घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर केल्या.

हे वाचलं का?

नागपुरात झालेल्या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, शहराला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ, एसडीआरएफ टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींनी बैठक घेतली. या बैठकीला कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, संदीप जोशी, तसेच इतरही लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि इतर उपस्थित होते.

नागपुरात पूरपरिस्थिती का उद्भवली? फडणवीस म्हणाले…

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अवघ्या 4 तासांत झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यातही केवळ 2 तासात 90 मि.मी. पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि नागनदी, पिवळी नदी लगतचा परिसरात पाणी शिरले. यामुळे रस्ते, पुलांचे नुकसान झाले.”

हेही वाचा >> Nagpur Rain : काळरात्र… दोन महिलांचा मृत्यू, 400 जणांना सोडावं लागलं घर; मध्यरात्री काय घडलं?

“नाल्याजवळच्या भींती पडल्या. घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. सुमारे 10 हजार घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रारंभिक अंदाज आहे. त्यांना तातडीची मदत 10 हजार रूपये देण्यात येईल. गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देईल. जेथे दुकानांचे नुकसान झाले, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत देणार. टपरी व्यवसायिकांना नुकसानीसाठी 10 हजारापर्यंत मदत देण्यात येईल”, असे फडणवीस यांनी सांगितले.

ऑरेंज अलर्टमुळे पथकं अलर्ट मोडवर

शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने सर्व टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. पोलिस विभाग सुद्धा सज्ज आहे. शहरातील परिस्थितीबद्दल माहिती देताना फडणवीस म्हणाले, “आज या स्थितीनंतर वीज बंद करण्यात आली होती. ती बहुतेक ठिकाणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. 14 ट्रान्सफॉर्मर अजून सुरु केलेले नाहीत कारण, तेथे पाणी कमी होण्याची वाट पाहिली जात आहे. तेथे ओलावा कायम आहे. कुठलाही अनर्थ होऊ नये, म्हणून वीज बंद आहे. सकाळपर्यंत ती सुरु करण्यात येईल.”

हेही वाचा >> Sushma Andhare : “वहिनी, एक शब्द देतेय…”, रश्मी ठाकरेंना अंधारेंनी काय दिलं वचन?

“पहिल्या तीन तासांतच लोकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाने केले. एनडीआरएफ, एसडीआरएफचा यात मोठा वाटा आहे. रिस्पॉन्स टाईम हा चांगला होता आणि त्याचे कौतूक केले पाहिजे”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

    follow whatsapp