Today Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या आगरा येथे 30 वर्षीय इंजीनिअर रोहित कुमारने एका हॉटेलमध्ये जीवन संपवलं. त्याचा मृतदेह हॉटेलच्या रुममध्ये आढळला. पोलिसांना घटनास्थळी एक पेन ड्राईव्ह आणि सुसाईड नोट मिळालं. यामध्ये रोहितने त्याची शेवटची इच्छा जाहीर केली आहे. मृत व्यक्ती मेरठचा रहिवासी होता.
ADVERTISEMENT
सुसाईड नोटमध्ये रोहितने लिहिलं, माझ्या मृत्यूनंतर 13 दिवस ड्रामा करू नका. सर्वांना घरी बोलवा. त्यानंतर 13 दिवसांचा ड्रामा करा. मी जसं गायब आहे, तसच मला राहूद्या. मी तिचा पहिला रुग्ण आणि ती माझी शेवटची डॉक्टर आहे. माझा मृतदेह कुटुंबियांना आणि नातेवाईकांना देऊ नका. दान करा किंवा मेडिकलच्या विद्यार्थ्यांना द्या. अवयव दान केलं पाहिजे. याचा वापर डॉक्टरांच्या अभ्यासासाठी होऊ शकतो. मी गायब होऊ शकतो, पण माझं शरीर नाही.
त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?
रोहितच्या जवळ सापडलेल्या पेन ड्राईव्हमध्ये ही सुसाईड नोट PDF फॉर्मेटमध्ये होती. यामध्ये एका महिला डॉक्टरचं नाव आणि नंबर लिहण्यात आलं होतं. हा डॉक्टर आता अन्य जिल्ह्यात कार्यरत आहे. आगरा पोलिसांनी म्हटलं की, शाहगंज येथे एका इंजीनिअरने 4 ऑगस्टला स्वत:चं जीवन संपवलं होतं. सफेद चादरीने त्यानं गळफास लावला होता. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली होती. यामध्ये एका महिला डॉक्टरचा उल्लेख होता. त्यात म्हटलं होतं की, हे माझं शरीर आहे, ते तुम्ही डोनेट करा किंवा मेडिकल कॉलेजला दान करा. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरु आहे.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! 'या' गाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल, नव्या सिस्टीमचा परिणाम...
मिळालेल्या माहितीनुसार, रोहितचे वडील सलेख चंद, विजिलेन्स विभागातून पाच वर्षांआधी निवृत्त झाले आहेत. रोहितच्या आईचा मृत्यू जवळपास दोन वर्षांपूर्वी झाला होता. रोहितचं लग्न झालं नव्हतं आणि तो घरीच राहत होता. त्याला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्याचा भाऊ आणि पत्नी दुबईत प्रोफेसर आहे. दोन्ही बहिणींचं लग्न झालं आहे. मृत रोहितने गाजियाबादमध्ये इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलं होतं. दिर्घकाळ नोकरी न लागल्याने त्याची मानसिक स्थिती बिघडली होती.
हे ही वाचा >> 3 बायका अन् फजिती ऐका! तिघींसोबत एन्जॉय करायचा, तो निघाला 'खरा खेळाडू', पण 1 दिवस खेळ झाला खल्लास, घडलं तरी काय?
ADVERTISEMENT
