मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! 'या' गाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल, नव्या सिस्टीमचा परिणाम...
मुंबईतील मध्य रेल्वेने वाशी स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममुळे काही लोकल गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलं असून काही लोकलवर ब्लॉकचा परिणाम होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

बातम्या हायलाइट

'या' लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल

लवकरच मध्य रेल्वेवर नव्या प्रणालीचं काम होणार सुरु...
Mumbai News: लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील मध्य रेल्वेने वाशी स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सिस्टीम सिग्नल नियंत्रित करण्यासाठी वापरली जात आहे. या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममुळे अनेक लोकल ट्रेन रद्द होतील. काही लोकल गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आलं असून काही लोकलवर ब्लॉकचा परिणाम होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मध्य रेल्वेचं वाशी स्थानकावरील काम 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या कालावधीत रात्री सुरू राहील. काही लोकल ट्रेन रद्द राहतील तर काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या कालावधीत दररोज रात्री 10:45 ते पहाटे 3:45 वाजेपर्यंत हे काम सुरू राहील. या काळात अप आणि डाउन दोन्ही लाइनवर काम केलं जाईल.
'या' गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
रात्री 8:54 वाजताची बेलापूर-सीएसएमटी लोकल वाशी स्थानकावरच रद्द केली जाईल. ती पुढे जाणार नाही. तसेच, रात्री 9:16 वाजताची बेलापूर-सीएसएमटी लोकल वडाळा स्थानकावरच थांबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त, रात्री 10:00 वाजताची वांद्रे-सीएसएमटी लोकल फक्त वडाळा स्थानकापर्यंतच धावेल. तसेच, रात्री 10:50 आणि 11:32 वाजताची पनवेल-वाशी लोकल फक्त नेरुळ स्थानकावरच थांबेल.
हे ही वाचा: नवरीला नवरा आवडलाच नाही..लग्नानंतर BF ला जंगलात बोलावलं अन् झाडाखाली घडली सर्वात भयंकर घटना! पतीचा मृतदेह..
'या' गाड्या रद्द राहतील
7 आणि 8 तारखेच्या सकाळच्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सकाळी 5:10 वाजताची सीएसएमटी-गोरेगाव लोकल सीएसएमटीवरून धावणार असून ती वडाळा रोड स्टेशनवरून धावेल. 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान काही लोकल पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वाशी पर्यंत रात्री 9:50, 10:14 आणि 10:30 वाजताच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, वाशी ते सीएसएमटी पर्यंत पहाटे 4:03 आणि 4:25 वाजताच्या गाड्या देखील रद्द राहतील.
हे ही वाचा: मेहुणी आणि पत्नी फोनवर सतत बोलायच्या, पतीला वाटलं दोघीही लेस्बियन, नंतर फॅनला लटकलेला आढळला मृतदेह...
वेलंगणी उत्सवासाठी विशेष गाड्या
चांगली बाब म्हणजे पश्चिम रेल्वेने वेलंकणी उत्सवासाठी काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या वांद्रे टर्मिनस आणि वेलंकणी दरम्यान धावतील. 27 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान या गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रेन क्रमांक 09093/4 वांद्रे टर्मिनस येथून रात्री 8:40 वाजता सुटेल. ही ट्रेन 27 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर रोजी देखील धावेल. ट्रेन क्रमांक 09094 वेलंकनी टर्मिनस येथून दुपारी 12:30 वाजता सुटेल. या विशेष गाड्यांसाठी रिझर्वेशन सुरू झाल्याची माहिती आहे.