पिंपरी : रिक्षा चालकाकडून 400 रुपयांची लाच घेतली, महिला वाहतूक पोलिसाला रंगेहात पकडलं

Female traffic police officer caught red-handed while accepting a bribe : महिला वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकाकडून 400 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं, लाचलुचपत विभागाची कारवाई

Female traffic police officer caught red-handed while accepting a bribe

Female traffic police officer caught red-handed while accepting a bribe

मुंबई तक

01 Dec 2025 (अपडेटेड: 01 Dec 2025, 12:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिला वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकाकडून 400 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

point

लाचलुचपत विभागाची कारवाई

पिंपरी : पिंपरी वाहतूक विभागातील महिला पोलिस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डन यांनी रिक्षाचालकाकडून लाच स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोघांनाही सापळा रचून पकडले आहे. 400 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पोलिस शिपाई वर्षा विठ्ठल कांबळे (वय 35) आणि ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा मछिंद्र गव्हाणे (वय 28) यांचा समावेश आहे. दोघांनीही विविध कारणांखाली रिक्षाचालकाकडून लाच मागितल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : विरोध करायचा असेल तर खुलेपणाने करा, आमच्यासोबत राहून गद्दारी करू नका, अजित पवारांचा माळेगावातून इशारा

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा पिंपरी, मोरवाडी आणि केएसबी चौक परिसरात प्रवासी वाहतूक करणारा रिक्षाचालक आहे. 17 नोव्हेंबर रोजी जादा प्रवासी घेतल्याचा मुद्दा काढत वर्षा कांबळे आणि कृष्णा गव्हाणे यांनी त्याच्याकडून प्रथम 300 रुपये घेतले. यानंतर 26 नोव्हेंबर रोजी पुन्हा रिक्षा थांबवून दरमहा ‘हप्ता’ म्हणून 500 रुपयांची मागणी केल्याने रिक्षाचालकाने एसीबीकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीची पडताळणी करताना दोघांनीही लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचण्याची तयारी केली. शनिवारी केएसबी चौक परिसरात ट्रॅप लावण्यात आला. त्यावेळी ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा गव्हाणे यांनी तक्रारदाराकडून 400 रुपयांची लाच स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्याला जागीच पकडले. पुढील चौकशीत पोलिस शिपाई वर्षा कांबळे हिला देखील ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईनंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे पथक करत आहे.एसीबीच्या या कारवाईमुळे वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराविरुद्धची मोहीम आणखी गती घेत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पुणे : विवाहित महिलेचा लग्न कर म्हणून तगादा, प्रियकराने गळा दाबून संपवलं, मृतदेह धाराशिवमध्ये पेट्रोल टाकून जाळला

    follow whatsapp