CBSE 10th-12th Result Update : सोशल मीडियावर सीबीएसई बोर्डाच्या निकालाबाबत अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. 2 मे रोजी हा निकाल जाहीर केला जाईल, अशा प्रकारचा मेसेज व्हायरल झाला. त्यानंतर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी खोट्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलं. सीबीएसई बोर्डाने नोटिस जारी करून निकालाबद्दलच्या फेक मेसेजबाबत विद्यार्थ्यांना अलर्ट केलं आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल नक्की कधी घोषित केला जाईल? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. याबाबत बोर्डाच्या सूत्रांकडे विचारणा केली असता, त्यांनी माहिती दिली की, सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर करण्याबाबत प्लॅनिंग सुरु आहे.
ADVERTISEMENT
निकाल अंतिम टप्प्यात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई निकालाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सीबीएसई बोर्ड निकाल जाहीर करू शकतो. पुढील काही दिवसांतच सीबीएसई बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधीही घोषित केली जाऊ शकते. यावर्षी हाय स्कूल आणि एंटरची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या वेबसाईटवर लक्ष ठेवावं, असं सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा >> बीडमध्ये दारूसाठी मुलानं 72 वर्षांच्या आईच्या डोक्यात दगड घातला, गाव हादरलं... तपासात काय आढळलं?
या वेबसाईटवर पाहू शकता सीबीएसई बोर्डाचा निकाल
एका वरिष्ठ सीबीएसई अधिकाऱ्याने इंडिया टुडेसोबत संवाद साधताना म्हटलं की,निकालाची तारीख अजूनही घोषित करण्यात आली नाहीय.याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाहीय.अफवांपासून सावध राहा.फक्त अधिकृत वेबसाईट्सवर विश्वास ठेवा. निकालाबाबत जोडलेल्या योग्य माहितीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट्स cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in वर विश्वास ठेवा. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये खोटी माहिती असू शकते.
हे ही वाचा >> आरारारारा! सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या, तुमच्या शहरात किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं? रेट एकदा चेक करा
गतवर्षी 13 मे 2024 ला दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. 12 वी मध्ये 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. हा निकाल वर्ष 2023 च्या तुलनेत चांगला होता. तर 10 वी च्या परीक्षेत 93.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. हा निकाल वर्, 2023 च्या तुलनेत 0.48 टक्के जास्त लागला होता. यावर्षीही चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. सीबीएसईने विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे की, निकालाच्या योग्य तारखेसाठी अधिकृत नोटिसची प्रतिक्षा करा. कोणत्याही खोट्या माहितीवर विश्वास ठेऊ नका.
ADVERTISEMENT
