Jalna Crime: जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका 28 वर्षीय व्यक्तीने चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निलेश निशिकांत कुलकर्णी (वय 28 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे रेल्वे स्थानकावर चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमानं विकृतीची परिसीमा ओलांडली
मुलांना कपडे काढायला सांगून अश्लील कृत्ये
18 जानेवारी 2026 रोजी, रविवार असल्याने पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा गावात खेळत होता. त्यावेळी आरोपीने त्या मुलासह त्याच्या मित्रांना चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या राहत्या खोलीत बोलावून घेतले. खोलीत गेल्यानंतर आरोपीने दरवाजा बंद करून मुलांना कपडे काढण्यास सांगितले व स्वतःही अश्लील कृत्ये केल्याचा आरोप आहे.
जीवे मारण्याची धमकी
पीडित मुलगा व त्याच्या मित्रांसोबत गैरवर्तन करत, पीडितास जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. नकार दिल्यानंतर आरोपीने मुलाचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला व त्या मुलाशी अश्लील वर्तन केले. तसेच आरोपीने त्या अल्पवयीन मुलास धमकावत त्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे.
हे ही वाचा : पुण्यातून परतलेल्या जोडप्याचा किरकोळ कारणावरून वाद; पत्नीने फाशी घेतली, पतीनेही संपवलं आयुष्य
आरोपीला पोलिस कोठडी
घडलेला प्रकार पीडित मुलाने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ घनसावंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. के. ढाकणे करीत आहेत. दरम्यान, जांबसमर्थ गावात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT











