Maharashtra Weather : राज्यावर पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांत तुफानी पाऊसl; 7 जिल्ह्यांवर आस्मानी संकट

मुंबई तक

• 05:00 AM • 07 Jul 2026

Maharashtra Weather : राज्यात मान्सून सक्रिय झाला असून काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणत पावसाने हजेरी लावली आहे, काही भागांत रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी रस्ते खचले असून नदी-नाल्याला पूर आल्याच्या घटना समोर आल्यात. अशातच 7 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे. 

Maharashtra weather

Maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी धुव्वादार पाऊस

point

7 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

Maharashtra Weather : राज्यात मान्सून सक्रिय झाला असून काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणत पावसाने हजेरी लावली आहे, काही भागांत रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी रस्ते खचले असून नदी-नाल्याला पूर आल्याच्या घटना समोर आल्यात. अशातच 7 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हे हे वाचा : इंद्रायणी नदीला पूर, आळंदी शहरातील पूल पाण्याखाली; गावातील घरे बुडाली

कोकण

कोकण विभागातील पालघर, रायगड या दोन जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट वर्तवण्यात आला आहे. ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट वर्तवण्यात आला. सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसर आणि पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्याला हलका ते मध्यम पावसाचा अलर्ट आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.  

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुले, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगरात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यासाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्ट अंदाज आहे.  

हे हे वाचा : महाबळेश्वरच्या वेण्णा नदीवरील पूल कोसळला, पर्यटक अडकले, नागरिकांची दाणादाण

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज जारी करण्यात आलाय.