Maharashtra Weather : राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे, 6 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचं सावट

मुंबई तक

• 05:00 AM • 20 Mar 2026

Maharashtra Weather : उन्हाळा ऋतू सुरु असूनही काही ठिकाणी अवकळी पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे. यामुळे अधिककरून ग्रामीण भागात शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. याचा फटका राज्यातील काही विभागांना पडला आहे, जाणून घेऊयात 20 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ज्यात उन्हाळा ऋतू सुरु असूनही काही ठिकाणी अवकळी पावसाचं सावट

point

जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...

Maharashtra Weather : उन्हाळा ऋतू सुरु असूनही काही ठिकाणी अवकळी पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे. यामुळे अधिककरून ग्रामीण भागात शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. अशातच 20 मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'तिकडं तुम्ही पोरं जन्माला घालायची आणि महाराष्ट्रात...', संदीप देशपांडे यांचा सरकारला तिखट सवाल

कोकण 

कोकण विभागात मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये वातावरण उष्ण दमट असण्याची शक्यता आहे. तसेच या विभागात आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवण्याची शक्यता आहे.  

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पुणे शहरात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. याच विभागातील सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अधिक शक्यतेचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला. यापैकी सोलापूरमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात उष्ण हवामानाचा अंदाज आहे. तसेच इतर जिल्ह्यात तसे की, बीड, परभणी आणि हिंगोलीत हलक्या पावसांची शक्यता आहे. तसेच लातूर, नांदेड आणि धाराशिवमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. 

हे ही वाचा : 'सरकारने टेलिव्हिजन वाल्यांची वाट लावली, सतत दबाव या बातम्या नको...' राज ठाकरेंनी गाजवली सभा, सरकारला धारेवर धरलं

विदर्भ 

विदर्भातील नागपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, वाशिम, आणि भंडारा येथे उष्ण तापमानाची शक्यता आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 34-38 अंश तर किमान 21-24 अंश राहील. वर्धा आणि गडचिरोलीमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाची अधिक शक्यता आहे.