Maharashtra Weather : राज्यावर दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांचं काही खरं नाही

Maharashtra Weather : राज्यावर दुहेरी हवामानाचं संकट निर्माण झालं आहे, ज्यात पालघर आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. 17 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घ्या.  

Maharashtra Weather

Maharashtra Weather

पंकजा मुंडे

• 05:00 AM • 17 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यावर दुहेरी हवामानाचं संकट

point

पालघर आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज

point

कूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घ्या.  

Maharashtra Weather : राज्यावर दुहेरी हवामानाचं संकट निर्माण झालं आहे, ज्यात पालघर आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अशातच 17 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घ्या.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : सावत्र बापाने 'त्या' हेतूने 24 वर्षीय विवाहित लेकीला खोलीत नेत...

कोकण 

कोकण विभागातील पालघर आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट वर्तवला आहे.  तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हवामान हे उष्ण आणि दमट राहणार आहे, दुपारी किंवा सायंकाळी हलक्या पावसाची स्थिती निर्माण होऊन यलो अलर्टचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहणार असून सायंकाळी किंवा दुपारी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. नंदूरबार या जिल्ह्यातील हवामान कोरडं राहील. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच सोलापूरमध्ये यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. 

मराठवाडा

मराठवाडा या विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या जिल्ह्यात सायंकाळी किंवा दुपारी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांना हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांत काही ठिकाणी
उष्ण व दमट हवामानाची स्थिती जाणवेल. 

हे ही वाचा : कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी, माधुरी हत्तीण मूळ घरी परतणार, वनताराची पोस्ट व्हायरल

विदर्भ 

विदर्भातील नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असून यलो अलर्टचा अंदाज आहे. लातूर, धाराशिव या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांत उष्णतेची लाट पसणार असल्याचा यलो अलर्ट आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.