Maharashtra Weather: मराठवाड्यात पावसाचा कहर, कोकणातही पावसाचा जोर, पाहा कसं आहे आजचं हवामान

Maharashtra Weather Today: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 सप्टेंबर 2025 रोजी राज्यात विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

maharashtra weather update yellow alert issued for rain in the state, know today's weather in the state

maharashtra weather update yellow alert issued for rain in the state, know today's weather in the state

मुंबई तक

23 Sep 2025 (अपडेटेड: 23 Sep 2025, 07:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाचा अंदाज

point

राज्यात विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज

point

काय सांगतंय हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 सप्टेंबर 2025 रोजी राज्यात विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट होऊन उष्णतेपासून दिलासा मिळेल. 23 सप्टेंबर राज्यातील एकूण पावसाच्या अंदाजाबाबत माहिती जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

हे ही वाचा : देवीचं दर्शनंही घेता आलं नाही! ज्योत आणायला गेला अन् घाटात वाहन झालं पलटी, तरुणाचा मृत्यू आणि 11 जणं...

कोकण विभाग :

कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे, तर ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गात वीज कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र :

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात ज्यादातर ढगाळ वातावरण राहील, सकाळी काही ठिकाणी सरी पडतील. कमाल तापमान 28से आणि किमान 22से राहण्याची शक्यता आहे, पावसाची संभावना 65 आहे.

उत्तर महाराष्ट्र:

उत्तर महाराष्ट्रातील विभागांमध्ये नाशिक आणि अहमदनगरात मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. नाशिकच्या घाट भागांसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत वीज आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला जारी केला आहे.

हे ही वाचा : लेकीनं आपल्याच आईला आणि वडिलांना हत्येच्या आरोपाखाली अडकवले, क्राइम पेट्रोल पाहून 'त्या' गोष्टीसाठी कट रचत..

विदर्भ :

विदर्भातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. बुलढाना, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत वीज कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तसेच इतर अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्याला कोणताही विशेष इशारा नाही.

 

    follow whatsapp