लेकीनं आपल्याच आईला आणि वडिलांना हत्येच्या आरोपाखाली अडकवले, क्राइम पेट्रोल पाहून 'त्या' गोष्टीसाठी कट रचत..
Crime News : गावातील एका मुलीने तिच्या वडिलांना आणि भावाला हत्येच्या आरोपाखाली अडकवले आणि तुरुंगात पाठवले होते. त्यानंतर तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरुणीने हा कट रचला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुलीने भावाला आणि वडिलांना हत्येच्या आरोपाखाली अडकवले

तरुणीने कट रचण्यामागचं कारण आलं समोर
Crime News : उत्तर प्रदेशातील पाकबारा पोलीस ठाणे परिसरातील गुरैठा गावात एका चित्रकाराची हत्या केली होती. याप्रकरणाचा तपास उघडकीस आला आहे. त्याच गावातील एका मुलीने तिच्या वडिलांना आणि भावांना हत्येच्या आरोपाखाली अडकवले आणि तुरुंगात पाठवले होते. त्यानंतर तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरुणीने हा कट रचला होता.
हे ही वाचा : तीन दिवस बंद खोलीत होता आईचा मृतदेह, मुलगा मृतदेहाभोवती होता बसून नंतर...
तरुणीचं मनोजवर जीवापाड प्रेम
संबंधित प्रकरणात एसपी सुभाष चंद्र गंगावर म्हणाले की, स्वाती नावाची तरुणी ही मनोजवर जीवापाड प्रेम करत होती. तिच्या वडिलांच्या आणि भावांच्या विरोधात कंटाळून तिने तिच्या प्रियकरासोबत एक कट रचला. त्यांनी क्राइम पेट्रोल पाहूनच खून करण्याचा आणि तिच्या वडिलांवर आणि भावांवर दोष लादण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर वडील आणि भाऊ तुरुंगात जाऊन दोघेही विवाह करतील, असा त्यांनी निश्चिय केला होता.
या एकूण कटाचा भाग म्हणून, रविवारी योगेश घटनास्थळी आला असता, आरोपींनी त्याला पकडले आणि गळा दाबला आणि नंतर त्याचे डोके विटेनं ठेचून हत्या करण्यात आली. पाकबारा पोलिसांनी रविवारी रात्री झालेल्या या वादातून महिलेला प्रियकर मनोज आणि त्याचा चुलत भाऊ मनजीत यांना अटक केली. तसेच दोघांमधील झालेल्या चकमकीत आरोपी मनोजच्या पायावर गोळी लागली होती.
फिल्मी स्टाईलने पकडला आरोपी नंतर ढिशक्याव...
गुरैठा गावातील रंगकर्मी योगेश कुमार (वय 22) सायंकाळच्या सुमारास सायकलवरून घराबाहेर पडला होता. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह गावाबाहेरील स्मशानभूमीवरील रस्त्यावरील झुडुपात आढळला होता. योगेशने त्याच्या मोबाईलवरून 112 वर फोन केला. नंतर या घटनेची माहिती देण्यात आली होती. या अधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पोलीस तपासात तिघेही निर्दोष असल्याचं दिसून आलं. तपासात विलंब होऊ लागल्याने बॉयफ्रेंड मनोज आणि चुलत भाऊन मनजीतसोबत मिळून त्याच्या हत्येचा कट रचल्याचं उघडकीस आलं आहे.