Maharashtra Weather : राज्यात नोव्हेंबर महिन्यात सामान्यत: कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा प्रभाव हा कुठेतरी कमी दिसणार आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, 10 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र्, आणि मराठवाड्यात काही ठिकाणी थंडीची सुरुवात होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात 10 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची एकूण परिस्थिती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सुप्रिया सुळेंची राजकीय प्रगल्भताच काढली, अंबादास दानवेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
कोकण विभाग :
कोकण विभागात मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहिल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. यामुळे तापमनाचा पारा आणखी खाली येईल, असा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातही सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या विभागातील पुणे जिल्ह्यात 31 अंश, सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सअस राहण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच या भागात काही प्रमाणात थंडीचं वातावरण निर्माण होईल असा अंदाज आहे. तसेच पावसाची परिस्थिती नसेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. यामुळे आता नागरिकांनी काळजी घ्यावी.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हवामान कोरडं राहिल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही प्रमाणात तापमान घटल्याने छत्रपती संभाजीनगरात इतर शहरांच्या तुलने गुलाबी थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : 'तुमच्या वडिलांनी काढलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी..' शेतकऱ्यांविरोधात गरळ ओकणाऱ्या विखेंना राजू शेट्टींनी सुनावलं
विदर्भ विभाग :
विदर्भ विभागात निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूरातील तापमान हे 14 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. पहाटेच्या वेळी वातावरणात थंडावा जाणवेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT











