पहिल्या प्रेमासाठी पत्नीला घटस्फोट दिला, पण गर्लफ्रेंडनेच काटा काढला! प्रियकराला धावत्या रिक्षातून ढकललं अन्..

Mumbai Shocking Viral News :  मुंबईत एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. येथे एका आगळ्या वेगळ्या लव्ह स्टोरीचं प्रकरण समोर आलं आहे.

Married Couple Shocking Viral News

Married Couple Shocking Viral News

मुंबई तक

26 Jul 2025 (अपडेटेड: 26 Jul 2025, 07:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गर्लफ्रेंडने धावत्या रिक्षातून बॉयफ्रेंडला मारला धक्का

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

point

पोलिसांनी आरोपींविरोधात केला गुन्हा दाखल

Mumbai Shocking Viral News :  मुंबईत एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. येथे एका आगळ्या वेगळ्या लव्ह स्टोरीचं प्रकरण समोर आलं आहे. यामुळे एका तरुणाला सर्वच गमवावं लागलं आहे. या व्यक्तीने पत्नीला सोडलं आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. पण त्याच्या गर्लफ्रेंडनेच त्याला लुटलं. तसच त्याला धावत्या रिक्षातून धक्काही मारला आणि ती मुलगी पळून गेली. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी महिला, तिचा मुलगा आणि अन्य सात आरोपींच्या विरोधात मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.  

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने विवाहित क्लासमेटसोबत अफेअर सुरु केलं होतं. दोघांनीही निर्णय घेतला की, त्यांच्या पार्टनरसोबत घटस्फोट घेऊन दोघेही एकत्र राहतील. त्यानंतर या व्यक्तीने घटस्फोट घेतला आणि क्लासमेटसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. पण ही चूक त्याला महागात पडली. यासाठी त्या व्यक्तीने त्याचं कुटुंब सोडलं. पण त्याच तरुणीने त्याला लुटलं.

हे ही वाचा >> "पतीच नव्हे तर दीर आणि मेव्हणा सुद्धा रोज माझ्यासोबत..." पत्नीने सांगितलं सासरच्या मंडळींचं 'ते' घाणेरडं सत्य!

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

ही धक्कादायक घटना चुनाभट्टी परिसरात घडली. 48 वर्षांच्या एका सरकारी कर्मचाऱ्याने त्याची जुनी क्लासमेट आणि त्याच्या 7 सहकाऱ्यांविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, 2003 मध्ये माझं लग्न झालं होतं. त्यानंतर 2018 मध्ये माझी जुन्या क्लासमेटसोबत भेट झाली. आमच्यात जवळीक वाढल्यानंतर आम्ही ठरवलं की, आम्ही एकत्रित जीवन जगू. यासाठी मी 2021 मध्ये माझ्या पत्नीला घटस्फोट दिला.

हे ही वाचा >> मुंबईची खबर: महापालिकेकडून 'या' पदांवर भरती होणार! 56 हजार रिक्त जागा अन् लाड-पागे समिती...

पीडित व्यक्तीने म्हटलं की, त्यानंतर माझी क्लासमेट आणि मी एकत्र राहू लागलो. याचदरम्यान, तिने घर खरेदी करण्यासाठी 15 लाखांची मदत मागितली. मी काहीही विचार न करता तिला पैसै दिले. तेव्हा मी तिला विचारलं की, तू पतीसोबत घटस्फोट कधी घेत आहे, त्यानंतर तिने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आमच्या दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले. तेव्हा ती म्हणाली, आधी तू पीएफमध्ये मला वारस कर आणि घर माझ्या नावावर कर. तरच मी तुझ्याशी लग्न करेल. मी असं करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आम्ही ऑक्टोबर 2024 मध्ये कुटुंबासमोर हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. 

    follow whatsapp