मेहुणीच्या प्रेमात वेडापीसा झाला..नंतर सासूचाही काटा काढला..डबल मर्डर केस वाचून हादरूनच जाल!

Double Murder Case Shocking Viral News : बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील नोखा पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजलीय.

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:49 PM • 08 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मेहुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या जावयाने केला मोठा कांड

point

शेतात मेहुणीसह सासूवरही केले धारदार शस्त्राने वार

point

जावयाने मेहुणी आणि सासूचा का केला खून?

Double Murder Case Shocking Viral News : बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील नोखा पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजलीय. एका व्यक्तीने त्याच्या मेहुणीची आणि सासूची हत्या केली. या डबल मर्डर केसमध्ये आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशहून अटक केली. याप्रकरणी एसपी रौशन कुमार यांनी म्हटलंय, नोखा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ग्राम लेवडा येथे एक व्यक्ती त्याच्या मेहुणीच्या प्रेमात पडला होता. पण त्याच व्यक्तीने मेहुणी रुपाली आणि सासू संतरा देवीची हत्या केली. 

हे वाचलं का?

त्या शेतात घडला मोठा हत्याकांड...

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत आरोपीची छोटी मेहुणी गंभीर जखमी झाली. तिला वाराणसीच्या ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं. एसपी कुमार यांनी म्हटलं की, मृत संतरा देवीचा जावई रवी चौधरी ज्याचं खरं नाव नाजिम हुसैन आहे. तो त्याची मेहुणी रुपालीवर एकतर्फी प्रेम करायचा. तो उत्तर प्रदेशच्या सारण जिल्ह्यातील गडखा बाजारात राहायचा. नंतर तो दुसऱ्या जागी गावात राहायला गेला. पण पोलिसांनी त्याला अटक केली. घटना घडल्यानंतर नाजिम हुसैन लेंवडा गावात त्याच्या सासरी आला होता.

हे ही वाचा >> राजा-सोनम हनिमून केस : गाईडने सांगितली थरारक घटनेची A टू Z माहिती, पोलिसांनीच...

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो निघून गेला. त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि तो नोएडा येथे फरार झाला. त्याची मेहुणी रुपाली दिल्लीत त्याच्यासोबत एक वर्ष राहिली होती. त्याचदरम्यान, आरोपीचं तिच्यासोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. पण काही काळानंतर दोघांमध्ये बोलणं बंद झालं. हीच गोष्ट आरोपीला खटकली.

त्याला वाटत होतं की, रुपाली त्याच्यासोबत नोएडात राहील. पण रुपालीने नकार दिला होता. घटना घडण्याच्या पहिल्या रात्री तो रुपालीला नोएडाला परत येण्यासाठी आग्रह करत होता. पण रुपालीने नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. गावातील लोकांना याबाबत कळू नये, म्हणून रुपाली शेताकडे गेली. पण त्याचवेळी आरोपी नाजिमने धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला.

हे ही वाचा >> ईदच्या दिवशी बकरी नव्हे, स्वत:च्याच मानेवरून फिरवला चाकू..यामागचं कारण वाचून हादरूनच जाल!

आरोपीने पोलिसांना सांगितलं की, रुपालीचा खून केल्यानंतर तो तिथेच होता. त्याचदरम्यान त्याची दुसरी मेहुणी त्या ठिकाणी आली आणि जोरजोरात ओरडू लागली.  तेव्हा तिलाही गंभीर जखमी केलं. त्यानंतर दोन्ही मुलांना शोधण्यासाठी सासू तिथे पोहोचली. तेव्हा आरोपीने सासू संतरा देवीवर हल्ला करून तिचाही खून केला.

    follow whatsapp