Marathwada rain update : राज्यात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे. राज्यातील मराठवाड्यात पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. ओल्या दुष्काळाचं सावट दिसून येत आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हा हवालदील झाला आहे. कोणाच्या घरावरील छप्पर उडून गेलं तर काही शेतकऱ्यांची पिकं वाहून गेल्याचे विदारक चित्र याठिकाणी दिसत आहे. पावसाची स्थिती पाहता अनेक जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 23 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने हे पत्रक जारी केलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भावाने बहिणीला केलं विधवा, दाजीवर धारधार शस्त्राने केले सपासप वार, 'त्या' कारणावरून उजवा हात कोपऱ्यापासून छाटला
मराठवाड्यातील बीड, धाराशीव आणि सोलापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची परिस्थिती पाहता या तिन्ही जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शाळांना जाहीर करण्यात आली असून शिक्षण विभागाने यासंदर्भात सुट्टीचे पत्रक जारी केलेलं आहे.
मराठवाडा विभागातील बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दुष्काळी भागात आता ओल्या दुष्काळाने नागरिकांना नकोसं करून ठेवलं आहे. अनेक गावांचे संपर्क तुटले असून शाळेत जाण्यासाठी तसेच शाळेतून येण्यासाठी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचमुळे शाळांना सुट्टीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
हे ही वाचा : आधी फेसबुकवर मैत्री केली अन् लग्नाचं आमिष दाखवलं, नंतर भेटायला बोलावून कॅनेल रोडला नेलं, गुंगीचं औषध देत मित्रासह....
विद्यार्थ्यांची वाहून गेली वह्या, पुस्तके
दरम्यान, बीड जिल्ह्यात कोसल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 23 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली, तर काही विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तके वाहून गेल्याचं विदारक चित्र आहे.
ADVERTISEMENT
