प्रेयसीच्या जळत्या चितेवर प्रियकरानं घेतली उडी, नागपूरमध्ये उडाली खळबळ

मुंबई तक

• 06:14 PM • 10 Jun 2025

Nagpur Crime News : प्रेमात लोक वेडे असतात असे अनेकदा ऐकलं आहे. मात्र, आता याची प्रचिती दिसून आली आहे. नागपूर जिल्ह्यातील शांती घाटावर एका तरुणाने प्रेयसीच्या अंत्यसंस्कारादरम्यान, जळत्या चितेत उडी घेतली आहे. तरुण प्रियकराने मद्यप्राशन करत हा प्रताप केला आहे. 

Nagpur Crime News

Nagpur Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रियकराने प्रेयसीच्या जलथ्या चितेत घेतली उडी

point

नागपूरातील खळबळजनक घटना

Nagpur Crime News : प्रेमात लोक वेडे असतात असे अनेकदा ऐकलं आहे. मात्र, आता याची प्रचिती दिसून आली आहे. नागपूर जिल्ह्यातील शांती घाटावर एका तरुणाने प्रेयसीच्या अंत्यसंस्कारादरम्यान, जळत्या चितेत उडी घेतली आहे. तरुण प्रियकराने मद्यप्राशन करत हा प्रताप केला आहे. अनुराग मेश्राम  वय वर्षे 27 असे त्याचे नाव आहे. तर अंकिता नितीन खोब्रागडे असे प्रेयसीचे नाव आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : आजीने बँकेतून 90 हजार रुपये काढले, नातवाने थेट तोंडात बोळा कोंबून... नांदेड हादरलं

दरम्यान, अंशिका आणि अनुराग हे दोघेही कन्हान परिसरातील रहिवासी आहेत. ते दोघांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हे प्रेमसंबंधात झाले. काही करणाने अंशिका ही तणावात होती. तिने रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. 

अंशिकाचे अंतिम संस्कार हे सोमवारी सायंकाळच्या सुमारास कन्हान नदीच्या काठी असणाऱ्या शांती घाट येथे झाले. आपल्या प्रेयसीच्या प्रेमात बुडालेल्या प्रियकराने दारूच्या नशेत जळत्या चितेत उडी घेतली. प्रियकराच्या या कृत्यानंतर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांनी त्याला चितेतून बाहेर काढलं. त्यानंतर त्याला एका जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. दरम्यान सध्या त्याच्यावर तपास सुरू आहे. 

संबंधत प्रकरणात पोलिसांकडून मोठी अपडेट

संबंधित प्रकरणात नवीन कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या नेतृत्वात संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितलं की, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर प्रकृती पाहता, पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हेही वाचा : बॉयफ्रेंडनं महिलेला OYO हॉटेलमध्ये नेऊन चाकूनं केले 17 वार, कारण ऐकूण हादरून जाल

पोलीस घटनास्थळावरून माहिती गोळा करुन या प्रकरणाचा शोध घेत आहेत. घटनास्थळावरून काही वस्तू मिळाल्या असून त्यावरुन ते पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अनुराग हा रुग्णालयात असून त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही अपडेट समोर आली नाही.