Nagpur Rain : ‘ हे दुःख सहन करण्यापलिकडचे’, पूरस्थिती बघून फडणवीस म्हणाले…

मुंबई तक

24 Sep 2023 (अपडेटेड: 24 Sep 2023, 06:10 AM)

नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तात्काळ पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 10 हजारपेक्षाही अधिक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आता जास्तीत जास्त मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Nagpur city 10,000 buildings damaged flooding of Ambazari lake due to heavy rains, Deputy Chief Minister Devendra Fadnavis assures maximum assistance

Nagpur city 10,000 buildings damaged flooding of Ambazari lake due to heavy rains, Deputy Chief Minister Devendra Fadnavis assures maximum assistance

follow google news

Nagpur Rain : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. नागपूरमध्ये मात्र मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव (ambazari lake) ओव्हरफ्लो झाल्याने नागपूरला पुराचा फटका बसला. या पुरामध्ये नागपूरमधील 10 हजारपेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. चार तासात 100 मि. मी. पाऊस झाल्यामुळे आणि त्याचा फटका नागरिकांनी बसल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm Devendra fadnavis) यांनी पूरग्रस्त परिसरातील घरांना भेट देत पूरस्थितीचा आढावा घेतला. पाहणी नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नागपूर शहरातील (Nagpur city) 10 पेक्षा जास्त घरांचे अधिक नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त मदत देण्याचे अश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. (nagpur heavy rains buildings damaged flooding of Ambazari lake Deputy Chief Minister Devendra Fadnavis help)

हे वाचलं का?

शहरात 4 तासात 100 मि. मी. पाऊस

शहरातील अंबाझरी परिसरात काल चार तासात 100 मि. मी. पाऊस झाला. त्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होऊन तलाव परिसरातील घरांमध्ये तलावाचे पाणी शिरले. त्यामुळे या परिसरातील अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेक घरातून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे घरातील चिखल आणि इतर घाण काढण्याचे काम सुरु असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अनेक तळमजले पाण्याखाली

नागपूर शहरात चार तासात 100 मि. मी. पाऊस झाल्यामुळे अंबाझरी तलाव भरुन त्याचे पाणी अनेक घरात शिरले. त्यामुळे अंबाझरी परिसरातील अनेक इमारतींचे तळमजले हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही झाल आहे.

जास्तीत जास्त मदत

नागपूरात झालेल्या पावसामुळे 10 हजारपेक्षा अधिक इमारतीमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. अनेक घरांचे नुकसान झाल्यामुळे लोकांचे दुःख तीव्र आहे. त्यामुळे सरकारकडून आता जास्तीत मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुन्हा ऑरेंज अलर्ट

नागपूरसह परिसराला हवामान विभागाकडून आता पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आता पावसाचा पुन्हा फटका बसण्याची चिंता नागपूरकरांना सतावू लागली आहे. सध्या पाणी ओसरले असले तरी घरात पाण्यामुळे झालेला चिखल आणि परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य दूर करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरु असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    follow whatsapp