Government Jobs : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) लिमिटेड या भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने 'असिस्टंट ऑफिसर (एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट)' पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 8 मे पासून सुरू झाली असून, ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 22 मेपर्यंत आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता काय?
या पदासाठी शैक्षणिक पात्रतेचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. पहिल्या पर्यायानुसार, उमेदवाराकडे पर्यावरण विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान 60 टक्के गुणांसह असणे आवश्यक आहे. दुसऱ्या पर्यायानुसार, कोणत्याही शाखेतील पदवीधराकडे पर्यावरण अभियांत्रिकी, पर्यावरण विज्ञान किंवा पर्यावरण व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवी (M.Sc./M.Tech) किंवा पदव्युत्तर डिप्लोमा किमान 60 टक्के गुणांसह असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेचा विचार करता, 22 मे रोजी उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमानुसार एससी/एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सवलत लागू असेल.
हे ही वाचा : नागपूर: कॉलेजमधील वासनांध मुलामुळे 26 वर्षीय सावत्र आई प्रेग्नंट, पण 55 वर्षाच्या नवऱ्याने बायकोला सांगितलं भलतंच!
'इतका' पगार मिळणार
उमेदवारांची निवड प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने ऑनलाइन लेखी परीक्षेचा समावेश आहे. या परीक्षेत 'विषय ज्ञान चाचणी' (Subject Knowledge Test) आणि 'एक्झिक्युटिव्ह अॅप्टिट्यूड टेस्ट' (Executive Aptitude Test) असे दोन भाग असतील. लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर आवश्यकता असल्यास वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. परीक्षेची निश्चित तारीख एनटीपीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर केली जाईल. या भरतीसाठी अर्जाचे शुल्क सामान्य (UR), ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गासाठी 500 रुपये असून एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 30 हजार ते 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे.
हे ही वाचा : बायकोचा राग काढला वडिलांवर, डोक्यात खुर्ची घालून संपवले; नेमकं काय घडलं?
'या' संकेतस्थळावर करा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी केवळ ऑनलाइन पद्धतीने 'careers.ntpc.co.in' या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज निश्चित वेळेत सादर करायचे आहेत. अर्जामध्ये माहिती भरताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभवाचे निकष हे 22 मे या तारखेनुसार गृहीत धरले जातील. अधिक तपशिलासाठी उमेदवारांनी 'www.ntpc.co.in' या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. सरकारी नोकरीची सुवर्णसंधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
ADVERTISEMENT











