Indigo Flight : भारताने ऑपरेश सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानना पळताभुयी थोडी करून सोडलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांतर्गत पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे. हे ऑपरेशन काही काळासाठी थांबवले गेले असल्याचं बोललं जात आहे. जर पाकिस्तानने काही अगाऊपणा केला तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ असे भारताने सांगितलं आहे. एवढं होऊनही पाकिस्तान सुधारायचं नाव घेत नाही. आपला बेजबाबदारपणा दाखवत आहे. बुधवारी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या एका इंडिगो विमान क्र 6E 2142 ला अचानक गारपीटाचा सामना करावा लागला. तसेच विमानावरती वीज कोसळली असल्याचं बोललं जात आहे. पायलटने पाकिस्तानच्या एअर स्ट्राईक ट्रॅफिक कंट्रोलकडे काही काळासाठी पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी मागितली. मात्र, ती मागणी पाकिस्तानने फेटाळली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई Tak जय हिंद उत्सव: "भाजप प्रमाणेच काँग्रेसनंही...", हिंदी सक्तीवर राज ठाकरेंनी फटकारलं
दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे विमानातील 227 जीव धोक्यात आले आहे. विमानात तृणमूल काँग्रेसचे पाचही खासदार होते. मात्र, परिस्थितीवर मात करत पायलेटला विमान सुरक्षितपणे उतरवण्यासाठी यश आलं आहे. या घटनेमुळे ही एक दिलासादायक बाब आहे.
काय होतं नेमकं प्रकरण?
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी इंडिगो विमानाचं अमृतसरहून उड्डाण झालं, अशावेळी वातावरणामुळे पायलटला गोंधळू लागला होता. हे खराब हवामान टाळण्यासाठी लाहोर एटीएसशी संपर्क साधला आणि पाकिस्तानच्या एअर स्ट्राईक ठिकाणी प्रवेश मिळण्याबाबत परवानगी मागितली. मात्र, लाहोरच्या एटीएसने ही विनंती फेटाळून लावली आहे. विमानाला वातावरणातील परिस्थितीचा सामना करावा लागला. पायलटने गारपीटीचा सामना करत विमान लँड करण्यासाठी यश मिळवलं आहे.
या प्रकरणात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले, विमान प्रवास करताना गारपीट झाली. यामुळे विमान हादरून गेलं होते. पायलटने अपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. दरम्यान, यामध्ये कोणताही जिवीतहानी निर्माण झाली नाही. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालयाने संबंधित घटनेत लक्ष्य घालत गांभीर्य ओळखले आणि तपासास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : 'ठाकरे-पवार ब्रँड संपविण्याचा प्रयत्न, पण... मी लिहून देतो', राज ठाकरेंचं जय हिंद उत्सवात मोठं विधान
पाच खासदार विमानात अडकले
दरम्यान, या विमानात पाच खासदारही होते. त्यापैकी, खासदार सागरिका अशा परिस्थितीत परिपूर्ण भयभीत झाल्या होत्या. त्यांनी प्रार्थना करत माझं आयुष्य संपलं असं म्हणत त्यांनी भिती व्यक्त केली. सागरिकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा विमान एअरपोर्टवर उतरले तेव्हा विमानाचे नोज कोन पूर्णपणे तुटलेला होते. विमानात सागारिकांसोबत असलेल्या टीएमसीच्या इतर खासदारांमध्ये नदीमुल हक, ओब्रायन, ममता ठाकूर आणि मानस भुईया हे देखील यांच्या विमानात होते.
ADVERTISEMENT
