DRDO Recruitment: अनेक तरुणांचं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून काम करण्याचं स्वप्न असतं. अशा तरुणांसाठी एक चांगली बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defense Research and Development Organization) म्हणजेच DRDO कडून 2025 वर्षातील वैज्ञानिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ज्या तरुणांनी इंजीनियरिंग म्हणजेच अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केलं आहे, अशा तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे. यासाठी इच्छुक उमेदवार rac.gov.in या DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या पदासाठी भरती
या भरतीचं नोटिफिकेशन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर पुढील 21 दिवसांपर्यंत यासाठी अर्ज केले जाऊ शकतात. या भरती एकूण 148 वैज्ञानिक पदांसाठी घेण्यात येणार आहे. यामध्ये DRDO, ADA आणि राखीव श्रेणींसाठीच्या पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन, मॅकेनिकल, कंप्यूटर सायन्स किंवा इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री असेल, तेच तरुण या भरतीसाठी पात्र असतील. यासोबतच त्यांच्याकडे GATE परीक्षाचा वैध स्कोर असणं देखील गरजेचं आहे.
हे ही वाचा: पैसा-पाणी: रिझर्व्ह बँकेने दिली मोठी आणि आनंदाची बातमी!
वयोमर्यादा
सामान्य (General) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांचं कमाल वय 35 वर्षे तसेच, ओबीसी (नॉन क्रिमी लेयर) प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि अनुसूचित जाती/जमातीसाठी 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क
जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तसेच अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरले जाईल.
हे ही वाचा: नाश्ता, मटण, चिकन! वाल्मिक कराडला जेलमध्ये तब्बल 10 हजाराची... तुरुंगातून आलेले रंजीत कासले काय म्हणाले?
निवड प्रक्रिया GATE स्कोअरवर आधारित असेल. उमेदवारांची यादी 1:10 च्या प्रमाणात केली जाईल आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड GATE स्कोरच्या 80 टक्के आणि मुलाखतीच्या 20 टक्के वेटेजनुसार केली जाईल.
ADVERTISEMENT
