Sadhu Kissing Foreigner Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये एक साधू घाटावर असताना परदेशी महिलेला किस करत असल्याचं पाहू शकता. हा व्हिडीओ खरा आहे, असं समजून अनेक लोकांनी या महिलेसह साधूवर अश्लील कृत्य व्हायरल केल्याचा आरोप करत आहेत. व्हिडीओ शेअर करत एका फेसबुक यूजरने म्हटलं, सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी आणि व्यूज मिळवण्यासाठी लोक हद्दच पार करत आहेत. मुली इन्स्टाग्रामवर अर्धनग्न होण्यासाठी तयार असतात. कोण जास्त नग्न होईल, यासाठी एका शोमध्ये प्रयोग सुरु असतात.
ADVERTISEMENT
अश्लीलता पसरवण्यासाठी एक पदरेशी महिला साधूसोबत किस करताना एक व्हिडीओ शूट करते, याप्रकारच्या व्हिडीओमुळे कोणता मेसेज व्हायरल होतोय? हे फेमीनिझम आहे की वल्गॅरिझम? आजतकने फॅक्ट चेक केल्यानंतर व्हायरल व्हिडीओ खोटा असल्याचा समोर आलं. हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने बनवण्यात आला आहे.
हे ही वाचा >> NCP नेते रामराजे निंबाळकरांच्या घरी पोलीस का आले? 'ती' महिला अन्... साताऱ्यात प्रचंड खळबळ!
सत्य कसं आलं समोर?
व्हायरल पोस्टच्या कमेंट्समध्ये अनेक लोकांनी म्हटलंय की, हा AI व्हिडीओ आहे. व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर स्पष्ट होतं की, साधूच्या हातांची हालचाल संशयास्पद आहे. हाताची मूवमेंट सामान्य स्वरुपाची नाहीय.व्हिडीओच्या किफ्रेम्सला रिव्हर्स सर्च केल्यानंतर आम्हाला अशाप्रकारचा व्हिडीओ Georgiana Loredana Gavrila नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 5 मार्च 2025 ला केलेल्या एका पोस्टमध्ये मिळाला. संपूर्ण व्हिडीओत महिला आणि साधू कोणत्याही प्रकारचं किस करताना दिसले नाहीत. यामुळे हे स्पष्ट होतं की, हा व्हायरल व्हिडीओ AI च्या मदतीने एडिट केला आहे.
हे ही वाचा >> जरा इकडे लक्ष द्या.. ऑफिसला जाणाऱ्या लोकांनाच येतोय सर्वाधिक हार्ट अटॅक, कारण काय?
Georgiana Loredana Gavrila एक इन्फ्लूएन्सर आहे. तिचे 24 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या अकाऊंटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत साधू त्या महिलेला आशिर्वाद देत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हे स्पष्ट होतं की, परदेशी महिलेसोबत साधूने किस केल्याचा व्हिडीओ खोटा आहे. हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
