NCP नेते रामराजे निंबाळकरांच्या घरी पोलीस का आले? 'ती' महिला अन्... साताऱ्यात प्रचंड खळबळ!
फलटणमध्ये आज सकाळी हा घटनाक्रम सुरू झाला. त्यावेळी रामराजे तर घरी नव्हतेच, पण पोलीस घरात गेल्यानंतर काहीवेळानं संजय नाईक निंबाळकर हे सुद्धा निवासस्थानातून बाहेर पडले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मंत्री जयकुमार गोरे यांचं बदनामी प्रकरण काय?

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर रडारवर का?
गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला मंत्री जयकुमार गोरे आणि रामराजे निंबाळकर यांच्यातला वादाची पुन्हा चर्चा सुरू झालीय. याचं कारण म्हणजे आज साताऱ्यातील वडूज पोलीस स्टेशनचं स्टेशनचे पथक आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी रामराजे निंबाळकरांच्या चौकशीसाठी फलटणच्या निवासस्थानी दाखल झालं. मात्र, रामराजे नाईक निंबाळकर निवासस्थानी हजर नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू संजय नाईक निंबाळकर यांना पोलीस अधिकाऱ्यांना भेटले.
हे ही वाचा >> असाइनमेंटच्या टेन्शनमुळे नर्सिंगच्या विद्यार्थ्यानं थेट...दुसऱ्या घटनेनं नांदेड हादरलं
फलटणमध्ये आज सकाळी हा घटनाक्रम सुरू झाला. त्यावेळी रामराजे तर घरी नव्हतेच, पण पोलीस घरात गेल्यानंतर काहीवेळानं संजय नाईक निंबाळकर हे सुद्धा निवासस्थानातून बाहेर पडले. रामराजे कुठे आहेत याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता पोलीस काय तपास करणार? रामराजे नाईक निंबाळकर सध्या कुठे आहेत असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
जयकुमार गोरे यांच्या या प्रकरणात दुसरीकडे या प्रकरणात माजी आमदार प्रभाकर घारगे यांनीही वकिलांसह वडूज पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव रामराजे यांनी चौकशीला हजेरी लावली नाही. त्यामुळे आता पोलीस काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहेत.
रामराजेंचं टेन्शन वाढवणारं जयकुमार गोरेंचं प्रकरण काय?
सध्या मंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांच्यावर 2017 मध्ये एका महिलेनं लैंगिक शोषण व अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप केले होते. या प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता.
पुढे 2017-2019 दरम्यान, या प्रकरणाची दोन वर्षे न्यायालयात सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयाने जयकुमार गोरे यांचा मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश दिले होते. अखेर 2019 ला या प्रकरणाचा निकाल लागला आणि जयकुमार गोरे यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं. यावेळी न्यायालयाने मोबाईलमधील सामग्री नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी हे प्रकरण बंद झालं होतं.
हे ही वाचा >> अत्यंत सुंदर दिसणाऱ्या तरुणीचा Live सुरू असतानाच खेळ खल्लास, थेट डोक्यातच...
गेल्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे 2025 मध्येच त्या महिलेने पुन्हा जयकुमार गोरेंवर आरोप केले. राज्यपाल आणि विरोधी पक्ष नेत्यांना पत्र पाठवून संबंधित महिलेनं मदतीची मागणी केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाला उजाळा दिला. तसंच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं.
राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच जयकुमार गोरे यांनी विधिमंडळाच्या आवारात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपली बाजू मांडली होती. ते म्हणाले होते, 2019 मध्येच न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलंय आणि प्रकरण निकाली निघालं आहे. त्यावेळी मोबाईलमधील मुद्देमाल जप्त करुन नष्ट करण्याचे आदेश दिले होते.
मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला लाच घेताना पकडलं
त्यानंतर गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. जयकुमार गोरे यांनी यावेळी आरोप केले होते की, संबधीत महिलेनं राजकीय हेतूने हे प्रकरण पुन्हा उकरून काढलं. या प्रकरणांमध्ये त्या महिलेला मदत करणारी राजकीय व्यक्तिमत्व कोण कोण आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती.
हे ही वाचा >> इथे नवऱ्या मुलाची व्हर्जिनिटी तपासते नवरीची 'काकी', आधी काकीसोबत संबंध अन् नंतर मुलीसोबत लग्न!
पोलिसांनी या प्रकरणात एकूण 12 जणांना नोटीस दिली होती. यामध्ये माजी आमदार प्रभाकर घारगे व रामराजे नाईक निंबाळकर यांना सातारा आणि वडूज पोलिसांनी नोटीस पाठवली होती. त्यांची चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. माजी आमदार प्रभाकर घारगे हे वडूज पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहिले. मात्र, रामराजे नाईक निंबाळकर हे चौकशीसाठी हजर न राहता त्यांनी प्रकृतीचे कारण देत गैरहजर राहिले.
दरम्यानच्या काळामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे आणि संबंधित आरोपी असणाऱ्या महिलेचे ऑडिओ रेकॉर्डिंग जयकुमार गोरे यांनी देखील माध्यमांसमोर आणले होते. त्यानंतर या प्रकरणांमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप देखील जयकुमार गोरेंनी केला. त्यामुळे रामराजे यांची चौकशी करावी अशी देखील मागणी केलेली होती. आज पोलीस थेट रामराजेंच्या घरी पोहोचल्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा होतेय.