Sambhaji Bhide: शिर्डीच्या साईबाबांना शिव्या दिल्या, आता भिडेंवर थेट…

मुंबई तक

01 Aug 2023 (अपडेटेड: 01 Aug 2023, 04:07 PM)

संभाजी भिडे यांनी शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर आता शिर्डी साई संस्थानाने त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर आज (1 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case has been registered today (August 1) after Sambhaji Bhide made a controversial statement about Sai Baba of Shirdi and now Shirdi Sai Sansthan has filed a complaint against him

A case has been registered today (August 1) after Sambhaji Bhide made a controversial statement about Sai Baba of Shirdi and now Shirdi Sai Sansthan has filed a complaint against him

follow google news

Sambhaji Bhide: नितीन मिराणे, शिर्डी: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अमरावती येथे शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांबद्दल (Sai Baba) बदनामीकारक वक्तव्य केल्यानंतर आता त्यांच्या अडचणीत बरीच वाढ झाली आहे. कारण त्यांच्याविरोधात आज शिर्डीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने साईबाबा मंदिर ट्रस्टच्या उपमुख्यकार्यकरी राहुल जाधव याची भेट घेत संभाजी भिडे यांनी साईबाबांबद्दल बदनामीकारक वक्तव्याचा निषेध करत, त्यांच्या विरोधात ट्रस्टने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने साई मंदिर ट्रस्टचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी शिरडी पोलीस स्टेशनमध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधात ipc 295 (अ) 153 (अ) 500 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली आहे. (sambhaji bhide shirdi saibaba mandir trust filed case against in shirdi police station)

हे वाचलं का?

दोनच दिवसांपूर्वी अमरावतीत संभाजी भिडेंचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला महात्मा गांधी आणि त्यांच्या आईवडिलांबद्दल केलेल्या विधानामुळे भिडे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यातच त्यांच्या भाषणाचा पुढचा भाग देखील समोर आला होता. ज्यामध्ये त्यांनी महात्मा फुले, लोकहितवादी यांच्यासह साईबाबांनाही शिवीगाळ केली होती.

हे ही वाचा >> Narendra Modi Pune visit :शरद पवार एकटेच बसले, मोदी पुण्यात आल्यानंतर काय घडलं?

संभाजी भिडेंची राजा राममोहन रॉयांवर अश्लाघ्य टीका

या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे म्हणाले होते की, ‘सूर्य मावळू शकत नाही, असं साम्राज्य आहे. गोळ्या घाल. उठाव कर, सशस्त्र उठाव याच्याने होणार नाही. इंग्रजांच्याकडून राज्य कसं मिळवायचं याचं शिक्षण घेतलं पाहिजे. असं बोलणारी कुत्री इथं या देशात, सुधारक नावाची जात एक उत्पन्न केली आणि सुपरगां#@, या भड@#ना सुधारक नावाच्या पदव्या देऊन या देशात तुमचेच सोयरी तुमच्यावर सोडले. बंगालमध्ये राजा राममोहन रॉय… पूर्ण देशाचा घात करणारा नालायक मनुष्य होता.”

महात्मा फुलेंबद्दलही भिडे बरळले

यावेळी भाषणात संभाजी भिडेंनी महाराष्ट्रातील समाज सुधारकांबद्दलही वादग्रस्त विधान केलं. “महाराष्ट्रात लोकहितवादी, महात्मा फुले हे नाव घेतल्यावर तुमच्या अंगाला झोंबलं असेल, सगळे सगळे 2 तास सांगू शकतो. प्रत्येकाच्या ढुं@#$ वर देशद्रोहाचे काय काय शिक्के आहेत ते”‘, असे अकलेचे तारे भिडेंनी तोडले.

हे ही वाचा >> Sambhaji Bhide: गांधी, फुले ते साईबाबा, भिडेंनी कुणालाच सोडलेलं नाही, तरीही…

साईबाबांनाही घातल्या शिव्या

“हिंदू समाज साईबाबाला पुजतो, तो साईबाबा काय लायकीचा भ@#वा आहे, एकदा पाहा तुम्ही. मी काय बोलतोय, जागा आहे बरं का… मी काय टकूरं सरकलेला माणूस नाहीये. हराम@#$ साईबाबा देवाच्या सिंहासनावर जाऊन बसलाय”, अशा अत्यंत शिवराळ भाषेत संभाजी भिडेंनी साईबाबांवर टीका केली आहे. त्यामुळे भिडेंवर विरोधकांकडून चांगली टीका होत आहे.

    follow whatsapp