महिलांच्या शौचालयात भर रात्री आरडाओरड अन्… साताऱ्यात भयंकर प्रकार

इम्तियाज मुजावर

26 Dec 2023 (अपडेटेड: 26 Dec 2023, 11:03 AM)

सातारा शहरात एक विचित्र प्रकार घडला आहे, महिलांना घाबरवण्यासाठी अज्ञातांनी एका पुतळ्याला विद्रुप करून तो पुतळा महिलांच्या स्वच्छतागृहात ठेवण्यात आला होता. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्वच्छतागृहात गेलेल्या महिला किंचाळतच बाहेर आल्यामुळे शहरात गोंधळ उडाला होता.

Mumbaitak
follow google news

Satara News: सातारा शहरामध्ये (Satara City) महिलांबाबत एक विचित्र घटना घडली आहे. एकीकडे महिलांच्या विकासासाठी वेगवेगळ्या पातळीवर विकासाच्या गोष्टी केल्या जात आहेत. तर दुसरीकडे सातारा शहरात महिलांचे खच्चीकरण आणि त्यांना घाबरवण्याचा खोडसाळपणा केला जात आहे. रात्रीच्या वेळी महिलांना घाबरवण्यासाठी महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये (Ladies Toilet) महिलेचा पुतळा (statue) आणून त्या पुतळ्याला चादर गुंडाळून ठेवण्यात आल्याने स्वच्छतागृहात गेलेल्या महिला किंचाळत बाहेर आल्या. त्यावेळी अनेक महिला प्रचंड घाबरल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर बॅटरीच्या आधारे चाचपणी केल्यानंतर कोणीतरी तो पुतळा ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर महिला शांत झाल्या.

हे वाचलं का?

महिलांबाबत केला खोडसाळपणा

सातारा शहरात रविवार पेठेमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. त्या स्वच्छतागृहाचा अनेक महिला वापर करत असतात. त्यामुळेच महिलांबाबत खोडसाळपणा करण्यासाठी अज्ञातांनी त्या स्वच्छतागृहामध्ये विद्रुप दिसणारा एक पुतळा बसवून त्याला चादर गुंडाळून ठेवण्यात आली होती.

हे ही वाचा >>Viral: ‘डोक्यावर पदर, तोंंडात गुटखा..’ नव्या नवरीचा कहर.. पोलीस स्टेशनात झाला राडा!

विद्रूप चेहऱ्याचा पुतळा

रात्रीच्यावेळी तो पुतळा भयंकर दिसत होता, त्यामुळे स्वच्छतागृहामध्ये गेलेल्या अनेक महिला घाबरून त्यांची तारांबळ उडाली. तर काही महिला किंचाळतच बाहेर आल्या. तो पुतळा इतका विद्रूप करून ठेवल्यामुळे आणि रात्रीची वेळ असल्यामुळे अनेक महिलांची बोबडी वळल्याचे दिसून आले.

महिलांनी फोडल्या किंचाळ्या

सातारा शहरात ही घटना घडली त्यावेळी रविवार पेठेतील लाईट बंद होती. त्यामुळे बॅटरीच्या उजेडात स्वच्छतागृहामध्ये जावे लागत होते. त्यावेळी तो विद्रुप केलेला पुतळा समोरून बघून अनेक महिला घाबरून बाहेर पळत सुटल्या. त्यावेळी काही महिलांनी ते आतील दृश्य पाहून किंचाळ्याही फोडल्या होत्या, त्यामुळे महिलांनी आरडाओरड केल्यामुळे नंतर परिसरातील नागरिक स्वच्छतागृहाच्या बाहेर जमा झाले. त्यानंतर हा प्रकार केलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी महिलावर्गासह अनेकांनी केली आहे.

संबंधितांवर करा कारवाई

सातारा शहरात महिलांबाबत हा विचित्र प्रकार घडल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महिलांबाबत हा केलेला खोडसाळपणा असून संबंधितावर कारवाई करण्याची मागणीही आता होऊ लागली आहे. या प्रकारामुळे महिला घाबरल्या असून या प्रकाराचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी महिलावर्गातून वाढली आहे.

    follow whatsapp