पुणे: अलिकडेच, एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये कॅनडातील एका रेस्टॉरंटमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची लांब रांग दिसत आहे. हे विद्यार्थी वेटर आणि सर्व्हिस स्टाफच्या नोकऱ्यांसाठी तासनतास वाट पाहत होते. त्याच वेळी, आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो आता भारतातील आहे आणि तो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. (such a rush for it jobs 3000 engineers seen standing in line for jobs in pune video goes viral)
ADVERTISEMENT
यावेळी प्रकरण कॅनडाचे नाही तर पुण्याचे आहे. जिथे सुमारे 3000 इंजिनीअर हे आयटी कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी रांगेत उभे आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी लांब रांग, मोकळे आकाश, उन्हात उभे असलेले चिंताग्रस्त इंजिनीअर आणि आयटी क्षेत्रात नोकरी मिळण्याची आशा.. या गोष्टी आता बरंच काही सांगून जात आहेत.
हे ही वाचा>> गुलेन बॅरी सिंड्रोम: पुणेकरांना भरली धडकी, 'हा' आजार आहे तरी काय?
भारतात आयटी नोकऱ्यांसाठी वाढती स्पर्धा!
व्हिडिओ पाहिल्यानंतर, हे दिसून येते की भारतात आयटी नोकरी मिळवणे आता पूर्वीपेक्षा जास्त आव्हानात्मक झाले आहे. बेरोजगारी आणि नोकरी मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
खरं तर आयटी सेक्टरमुळे देशात एक प्रकारे आर्थिक क्रांती झाली. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आणि एक उच्च दर्जाची लाइफस्टाइल यामुळे मागील काही काळापासून अत्यंत मोठ्या प्रमाणात तरुणाईचा ओढा हा आयटी सेक्टरकडे वळला आहे. पण आता यातूनच येथे नोकऱ्या मिळविण्याची जीवघेणी स्पर्धा देखील तेवढीच वाढली आहे.
हे ही वाचा>> Viral Video: विमानात केली 'ती' गोष्ट, एअर होस्टेसचा तर कार्यक्रमच झाला...
पुण्यातील मगरपट्टा परिसर, आयटी कंपन्यांचा बालेकिल्ला
हा व्हिडिओ पुण्यातील मगरपट्टा भागातील असल्याचे सांगितले जात आहे, जो आयटी कंपन्यांसाठी हॉटस्पॉट आहे. येथे 3000 हून अधिक इंजिनीअर हे नोकरी मिळविण्यासाठी रांगेत उभे आहेत. यावरून आयटी क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा किती तीव्र झाली आहे हे दिसून येते.
सोशल मीडियावर वाद
या व्हायरल व्हिडिओबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही यूजर्स म्हणतात की, आयटी क्षेत्रात नोकरी मिळवणे पूर्वीपेक्षा जास्त कठीण झाले आहे, तर काहींचे मत आहे की भारतातील आयटी क्षेत्रात फारशा नोकऱ्या निर्माण होत नाहीत. अनेकांनी या लांब रांगांना 'छळ' म्हटले आहे आणि अशी परिस्थिती बदलण्याचा दुसरा कोणताही मार्ग असू शकत नाही का? असा सवालही उपस्थित केला आहे.
कॅनडातील VIDEO
एका यूजरने तर असंही म्हटलं की, अशा प्रकारे रांगेत उभे राहून नव्हे तर बायोडेटाच्या आधारे नोकरी दिली पाहिजे.
ADVERTISEMENT
