Maharashtra Weather : महाराष्ट्रात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची लाट जाणवण्यास सुरुवात झाली असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या अंदाजानुसार 4 डिसेंबर रोजी राज्यातील बहुतेक भागांत कोरडे व थंडीचे वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली. उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे तापमानात घसरण होत असून, नागरीकांनी सकाळ-संध्याकाळी उबदार कपडे घालण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबई : 9 वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये ओढलं अन् अत्याचार केले, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचं संतापजनक कृत्य
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत 4 ते 7 डिसेंबरदरम्यान सलग तीन दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा इशारा बृहन्मुंबई महापालिकेनं दिला आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्व 4 डिसेंबर रोजी जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरडं वातावरण राहिल असा हवामान विभागाचा अंदाज वर्तवला आहे. पुण्यातील किमान तापमानात 1 अंश सेल्सिअसने वाढ होईल.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये गारठा कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : मुंबईची खबर: दादर-CSMT स्टेशनवरील गर्दी कमी होणार! मुंबईतील स्थानकांवर उभारणार 20 नवे प्लॅटफॉर्म्स... प्रशासनाचा मोठा निर्णय
विदर्भ विभाग :
विदर्भात काही भागांमध्ये तापमानात देखील फारसा चढ-उतार होणार नाही.1 तर अमरावतीत 13 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











