मुंबई : 9 वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये ओढलं अन् अत्याचार केले, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचं संतापजनक कृत्य

मुंबई तक

Mumbai Crime : मुलगी लिफ्टजवळ उभी असताना आरोपीने तिला अचानक आत खेचले आणि तिच्यावर गैरवर्तन केले. पीडितेने हा संपूर्ण प्रकार आईला सांगितला. त्यानंतर प्रकरणाची माहिती बाहेर आली.

ADVERTISEMENT

Mumbai Crime
Mumbai Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : 9 वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये ओढलं अन् अत्याचार केले

point

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचं संतापजनक कृत्य

Mumbai Crime : मुंबईत पुन्हा एकदा बालसुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. शहरातील एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलं असून, नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

घटनेतील आरोपी हा मुंबई पोलिस दलातून निवृत्त झालेला अधिकारी असून पीडित मुलीचे कुटुंब त्याच इमारतीत वास्तव्यास आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, मुलगी लिफ्टजवळ उभी असताना आरोपीने तिला अचानक आत खेचले आणि तिच्यावर गैरवर्तन केले. मुलगी घाबरलेली असली तरी धाडस करून तिने हा संपूर्ण प्रकार आईला सांगितला. त्यानंतर प्रकरणाची माहिती बाहेर आली.

मुलीच्या आईने तात्काळ कस्तुरबा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार नोंदवताच पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आहिल्यानगर : 3 लाख घेऊन लग्नाची नोटरी, पण कोर्टात विवाह उरकून घरी परतताना नवरी पळून गेली

या प्रकरणामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भय आणि संताप दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत. मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालक पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहेत. विशेषतः पोलिस सेवा बजावलेला आणि समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळलेला माणूसच अशा कृत्यात सामील असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ज्यांच्याकडे सामान्य नागरिक संरक्षणाची अपेक्षा ठेवतात, तेच जर अशा घृणास्पद कृत्यात सामील झाले तर लोकांनी विश्वास कुणावर ठेवायचा?” असा प्रश्न पालक व स्थानिक मंडळी विचारताना दिसून येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp