अमरावती : सरकारी कर्मचाऱ्याने पत्नीला डोक्यात उखळ घालून संपवलं, दुसऱ्या पतीला ब्लॅकमेल करणे पिंकीच्या अंगलट

Amravati Crime : ब्लॅकमेलिंगला कंटाळून सरकारी कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीची डोक्यात उखळ घालून हत्या केल्याची घटना अमरावतीमध्ये घडलीये.

Amravati Crime

Amravati Crime

मुंबई तक

03 Dec 2025 (अपडेटेड: 03 Dec 2025, 11:05 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती : सरकारी कर्मचाऱ्याने पत्नीला डोक्यात उखळ घालून संपवलं

point

दुसऱ्या पतीला ब्लॅकमेल करणे पिंकीच्या अंगलट

Amravati Crime : अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत घडलेल्या नीलिमा उर्फ पिंकी खरबडे (45) यांच्या हत्येप्रकरणाचा गुन्हे शाखेने अखेर उलगडा केला आहे. ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिच्या दुसऱ्या पतीनेच तिची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी आरोपी सनी उर्फ नितीन इंगोले (32, रा. अशोक कॉलनी) याला अटक करण्यात आली आहे. तो भूजल सर्वेक्षणच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे वाचलं का?

नीलिमाचे पहिले पती आणि मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ती एकटी राहत होती. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख सनीशी झाली आणि दोन महिन्यांपूर्वी दोघांनी लग्न केले. मात्र सनी सरकारी कर्मचारी असल्याने हा विवाह कायदेशीररित्या अवैध होता. या पार्श्वभूमीवर नीलिमा सतत दबाव टाकत असल्याचा सनीला राग होता. तिने गाडगेनगर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती. या दबावामुळे आणि सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे सनीने हत्येचा निर्णय घेतल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा : 'ही कसली पद्धत? व्हिडीओ शूटींग करा रे...',शिरुरच्या आजी-माजी आमदारांमध्ये मतदान केंद्राबाहेर बाचाबाची VIDEO

हत्या कशी घडवली?

30 नोव्हेंबरच्या रात्री, घरकाम करणारी महिला गेल्यानंतर सनी दारूच्या बाटल्या घेऊन नीलिमाच्या घरी गेला. दोघांनीही मद्यपान केले. त्यानंतर नीलिमा झोपी गेली. ती गाढ झोपेत असताना सनीने आधी उखळाच्या दगडाने तिच्या डोक्यावर हल्ला केला. अचानक वेदनेने ती किंचाळू लागली तेव्हा त्याने चाकूने तिच्या मानेवर जोरदार वार केले. या हल्ल्यात निलिमाचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर सनी मागील दरवाजातून पळून गेला.

लोकेशनने उलगडा

या गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीपासूनच पोलिसांचा संशय सनीवर होता. गुन्हे शाखेने त्याचा मोबाइल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि घरातील डीव्हीआरची तपासणी सुरू केली. तपासात सनीचा मोबाइल दोन दिवस एकाच ठिकाणी असल्याचे दिसून आले. हत्येच्या वेळीदेखील तो नीलिमाच्या घरात असल्याचे लोकेशनवरून स्पष्ट झाले. हा पुरावा निर्णायक ठरला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या संपूर्ण कारवाईत गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या हत्येच्या उलगड्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pannalal Surana : जनतेने नाकारले म्हणून मंत्रिपद नाकारणारा नेता काळाच्या पडद्याआड, पन्नालाल सुराणा यांचे निधन

    follow whatsapp