मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरनं घेतला पेट, चालत्या वाहनातून ड्रायव्हरने मारली उडी अन्...

Mumbai Pune Expressway Contaner Fire : मुंबई-पुणे महामार्गावरती काही दिवसांपूर्वी टँकर पलटी झाला होता, यामुळे महामार्गावरील वाहतूक तीन दिवस ठप्प राहिली होती. त्यानंतर आता पुणे- मुंबई महामार्गावर एका चालत्या कंटेनर ट्रकला भीषण आग लागली होती. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी घडली नाही. 

Mumbai Pune Expressway Contaner Fire

Mumbai Pune Expressway Contaner Fire

मुंबई तक

16 Feb 2026 (अपडेटेड: 16 Feb 2026, 04:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई-पुणे महामार्गावरती कंटेनरला आग

point

चालत्या ट्रकमधून चालकाने मारली उडी

Mumbai Pune Expressway Contaner Fire : कृष्णा पांचाळ - मुंबई-पुणे महामार्गावरती काही दिवसांपूर्वी टँकर पलटी झाला होता, यामुळे महामार्गावरील वाहतूक तीन दिवस ठप्प राहिली होती. त्यानंतर आता पुणे- मुंबई महामार्गावर एका चालत्या कंटेनर ट्रकला भीषण आग लागली होती. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी घडली नाही. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे: इमारतीच्या पार्किंगमधील 15 फूट खोल खड्ड्यात 4 वर्षांची मुलगी पडली, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

चालत्या कंटेनर ट्रकला भीषण आग

कंटेनर ट्रकला भीषण आग लागताच, चालकाने आपला जीव वाचवण्यासाठी सतर्कता दाखवली. चालकाने चालत्या ट्रक कंटेनरमधून उडी मारली, सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नाही. कंटेनरला आग लागल्याचे बघताच, चालकाने सतर्कता दाखवत गाडी थांबवली आणि बाहेर उडी मारली. 

चालकाने उडी मारून वाचवला जीव

या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये कंटेनर आगीच्या ज्वाळांनी वाढलेला दिसतो. आगीचे नेमकं कारण समोर आलेलं नाही. गाडीचे इंजिन आणि ब्रेक सिस्टम अधिक गरम झाल्याने एक्सप्रेसवेच्या चढ-उतारांवर याआधी देखील अशीच घटना घडली होती.  

हे ही वाचा : आधी 'वेलेंटाईन डे' अन् दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला संपवलं, तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन सगळंच सांगितलं

या प्रकरणाची माहिती मिळताच, महामार्ग पोलीस आणि आयआरबी एंजल रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचले आणि मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली. सध्या वाहतुकीची परिस्थिती नियंत्रणात आहे. 

    follow whatsapp