लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या दोन मुलींवरच बलात्कार, 14 वर्षांची मुलगी 38 वर्षाच्या पुरुषामुळे गर्भवती

मुंबई तक

• 08:00 AM • 26 Mar 2026

लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या 13 आणि 14 वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार करून त्यापैकी एकाला गर्भवती केल्याप्रकरणी एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Tak
Google CTA

नवसारी (गुजरात): गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील एका 38 वर्षीय व्यक्तीला त्याच्या लिव्ह-इन पार्टनरच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार करून त्यापैकी एकाला गर्भवती केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा 14 वर्षीय मुलीने पोटदुखीची तक्रार केली, तेव्हा वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. त्यानंतर, दोन्ही मुलींनी जो जबाब दिला त्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

उपअधीक्षक बी. व्ही. गोहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या सहा वर्षांपासून चिखली तालुक्यात एका महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. ती महिला तिच्या पहिलाय पतीपासून झालेल्या 13 आणि 14 वर्षांच्या दोन मुलींसह राहत होती. एवढंच नव्हे तर आरोपीचे दोन अल्पवयीन मुलं देखील या महिलेसोबतच राहत होते. कारण महिलेचा सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. एका घरात एकत्र राहणाऱ्या या कुटुंबात ही घटना घडली.

हे ही वाचा>> ब्युटी पार्लरवालीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडला, शेवटी सगळं काही संपलं; थेट तिच्या दुकानासमोर जाऊन...

पोलिसांच्या माहितीनुसार, जेव्हा महिलेच्या एका मुलीने पोटदुखीची तक्रार केली, तेव्हा डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत 14 वर्षांची मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर, दोन्ही मुलींनी सांगितले की, आरोपीने गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला होता. दुसऱ्या मुलीचीही वैद्यकीय तपासणी सुरू आहे. 

हे ही वाचा>> हॉटेलवर पोलिसांची रेड, 11 तरुण आणि 4 तरुणी नको 'त्या' अवस्थेत, पोलिसांनी सुट्टी दिली नाही..

दोन्ही पीडित मुलींनी आरोपीविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले. ज्यानंतर आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.